Shocking News: नवरीला मंगळसूत्र घातलं अन् कोसळला, मंडपातच नवरदेवाचा मृत्यू, मन सुन्न करणारी घटना

Groom Death During Wedding Ceremony: कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे लग्नाच्या मंडपात लग्नाच्या विधी पार पाडत असताना वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

बागलकोट: हृदयविकाराच्या झटक्याने होणारे मृत्यू भयंकर अन् मन सुन्न करणारे असतात. अगदी चालता बोलता जेवणाच्या ताटावर  हृदयविकाराच्या झटक्याने जीव गेल्याच्या अनेक घटना घडतात, ऐकायला मिळतात.  कर्नाटकमधून आता असाच एक हृदयद्रावक प्रकार पुन्हा समोर आला आहे. ज्यामध्ये लग्न लग्नाच्या वेदीवर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे लग्नाच्या मंडपात लग्नाच्या विधी पार पाडत असताना वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यामध्ये लग्नसोहळ्यातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी शहरात लग्न समारंभात मंगळसूत्र बांधल्यानंतर काही वेळातच एका 25 वर्षीय वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. लग्नानंतर नवरदेव प्रवीण अचानक बेशुद्ध पडला. थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेने लग्नघरात शोककळा पसरली. 

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, मंगळसूत्र बांधल्यानंतर प्रवीणला अचानक छातीत दुखू लागले आणि तो जमिनीवर कोसळला, त्याच्या पालकांनी त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तिथे पोहोचताच डॉक्टरांनी प्रवीणला पाहिले आणि त्याला मृत घोषित केले. आता या घटनेनंतर प्रवीणच्या कुटुंबात दुःखाचे वातावरण आहे. तसेच, त्याच्या नवविवाहित पत्नीच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नक्की वाचा : मोदी सरकारनं शशी थरुर यांच्यावर सोपावली नवी जबाबदारी, अमेरिकेत फाडणार पाकिस्तानचा बुरखा )

दरम्यान, याआधी उत्तरप्रदेशमध्येही अशीच एक घटना घडली होती. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात लग्नसोहळ्याचा आनंद सुरु असतानाच एक हृदयद्रावक घटना घडली होती. थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यानंतर घरी जाण्यासाठी नववधू गाडीत बसत होती. याचवेळी अचानक नवरदेव बेशुद्ध झाला आणि रुग्णालयामध्ये नेण्याआधीच त्याचा अंत झाला. 

Advertisement

(नक्की वाचा- Bhushan Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश, घेतली पदाची शपथ)