Shocking News: एका वर्षाच्या बाळाने नागाचा चावा घेतला, क्षणात सापाचा मृत्यू; असं कसं घडलं?

चिमुकल्याला मुलाला कोणताही त्रास जाणवला नसून त्याची तब्येत ठीक असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

बिहार: बिहारमधील चंपारण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंपारण येथे एका दीड वर्षाच्या मुलाला साप चावला. चिमुकल्याला साप चावल्याने सगळेच हादरुन गेले, मात्र काही वेळाने त्या सापाचाच मृत्यू झाला.  चिमुकल्याला मुलाला कोणताही त्रास जाणवला नसून त्याची तब्येत ठीक असल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारी शाळेची इमारत कोसळून 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 35 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

अधिक माहितीनुसार, चंपारणच्या मजौलिया ब्लॉकमधील मोहछी बंकटवा गावात एक अजब प्रकार घडला. या गावात गोविंदा नावाचा दीड वर्षाचा चिमुकला त्याच्या घरात खेळत होता. याचवेळी खेळताना त्याने एक साप पाहिला. त्याला ते खेळणे वाटले आणि ते खेळणे समजून त्याने प्रथम तो पकडला आणि नंतर दातांनी चावला. मुलाने सापाला चावताच, साप लगेचच मेला

आता प्रश्न असा निर्माण होतो की हे कसे घडले? मुलाला चावल्यानंतर लगेचच साप कसा मेला. तज्ञ यामागे वैज्ञानिक कारणे देत आहेत. नेचर एन्व्हायर्नमेंट अँड वेल्फेअर सोसायटी (न्यूज) चे प्रकल्प व्यवस्थापक अभिषेक म्हणाले की, जर सापाने मुलाला चावले असेल आणि मुलाला काहीही झाले नसेल, तर याची दोन कारणे असू शकतात. 

Kerla Jackfruit Story: दारु न पिताच टेस्टमध्ये दोषी, एका फणसामुळे 3 ST चालक फसले, हे कसं घडलं?

एक म्हणजे साप विषारी नसेल. दुसरे कारण म्हणजे जरी तो नागासारखा विषारी असला तरी तो मुलाला चावू शकला नसता. त्याआधीच मुलाने त्याला दातांनी चावते. कारण जर तुम्ही सापाचा पाठीचा कणा कापला तर तो लगेच मरतो. आणि जर तुम्ही सापाला आधीच मारले तर तो चावू शकणार नाही. हेच कारण आहे की साप मेला पण मुलाला काहीही झाले नाही.

Advertisement
Topics mentioned in this article