Shocking news: पॅनकार्डचा गैरवापर, हिरे व्यापाऱ्याचा भन्नाट गेम, थेट इस्त्रीवाल्याला 598 कोटींची आयकर नोटीस

जितेंद्र यांचे वकील राकेश ठाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र यांचे पॅन कार्ड 2 वर्षांपूर्वी हरवले होते.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • अजमेरमधील हातागाडीवर कपडे प्रेस करणाऱ्या जितेंद्र बाडोलियाला 598 कोटींची आयकर विभागाने नोटीस दिली
  • जितेंद्र यांचे पॅन कार्ड हरवल्यामुळे बनावट बँक खाते उघडून त्यांच्याच कागदपत्रांचा गैरवापर करण्यात आला
  • तीन महिन्यांत 600 कोटी रुपयांच्या व्यवहारांसाठी सुरतमध्ये मेसर्स मनन एंटरप्रायझेस कंपनी बनवण्यात आली होती
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

एका बाजूला रोजची भाकरी मिळवण्यासाठी संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला 598 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस. ही फिल्मी वाटणारी घटना अजमेरमध्ये प्रत्यक्ष घडली आहे. जितेंद्र बाडोलिया या गरीब व्यक्तीच्या कागदपत्रांवर एका भामट्याने कंपनी उघडली. त्यावर 3 महिन्यात 600 कोटींचा व्यवहार केला. आता आयकर विभाग जितेंद्र यांच्या मागे लागला आहे. या प्रकारामुळे बँकिंग व्यवस्थेतील त्रुटी आणि केवायसी प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजस्थानमधील अजमेरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावर कपड्यांना इस्त्री (प्रेस) करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या व्यक्तीला आयकर विभागाने (Income Tax Department) तब्बल 598 कोटी रुपयांच्या व्यवहाराची नोटीस धाडली आहे. ही नोटीस पाहताच संबंधित व्यक्तीची प्रकृती बिघडली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.

अजमेरच्या रामनगर भागात जितेंद्र बाडोलिया हे हातागाडीवर कपडे प्रेस करण्याचे काम करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ते संसार चालवत असताना, अचानक आयकर विभागाने त्यांना 598 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा हिशोब मागितला. एवढी मोठी रक्कम ऐकून जितेंद्र यांना धक्का बसला.  त्यानंतर  त्यांची शुगर 500 च्या वर गेली आहे. त्यांनी अन्नपाणीही सोडले आहे. जितेंद्र यांच्या मते, त्यांचा अशा कोणत्याही मोठ्या व्यवहाराशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. त्यांचे कुटुंबिय ही या धक्क्यातून सावरले नाहीत. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News: आनंदाच्या सहलीचा भीषण शेवट! वॉटरपार्कच्या स्लाइडनं महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त, भयंकर घडलं

जितेंद्र यांचे वकील राकेश ठाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र यांचे पॅन कार्ड 2 वर्षांपूर्वी हरवले होते. याचाच फायदा घेऊन कोणीतरी बनावट बँक खाते उघडले. त्यावर जीएसटी क्रमांक मिळवून व्यवसाय सुरू केला. तपासात असे समोर आले आहे की, पाली येथील एका हिरे व्यापाऱ्याने जितेंद्र यांच्या कागदपत्रांचा वापर करून गुजरातच्या सुरतमध्ये 'मेसर्स मनन एंटरप्रायझेस' नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून अवघ्या 3 महिन्यांत 600 कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले. याने राजस्थान पोलीस ही आवाक झाले आहेत. 

नक्की वाचा - Traffic Jam: समृद्धी महामार्गावर ट्रकच्या लांबच लांब रांगा! अपघाताचा धोका वाढला, RTO चे दुर्लक्ष, Video Viral

या प्रकरणात आयकर विभागाने संबंधित बँक व्यवस्थापकालाही नोटीस बजावली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असताना बँकेने वेळेत माहिती का दिली नाही, असा सवाल विचारण्यात आला आहे. सध्या गंज पोलीस ठाण्यात याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला असून पोलीस या मोठ्या रॅकेटचा शोध घेत आहेत. कागदपत्रांच्या चोरीतून होणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांचा एक हा प्रकार उघडकीस आला आहे. कपडे प्रेस करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर चक्क हिरे व्यापाराची फर्म काढून कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आला. या प्रकरणी आता पोलीस तपासात सुरत कनेक्शन समोर आले असून, आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीने एका गरिबाच्या आयुष्याशी खेळ केल्याचे स्पष्ट होत आहे.