- मजूर गणेश गुर्जर यांच्या कुटुंबाला ३ लाख ९२ हजार रुपयांचे वीज बिल पाठवण्यात आले आहे
- घरात फक्त तीन बल्ब आणि दोन पंखे असूनही इतक्या मोठी रक्कमेचं बिल आलं आहे
- वीज विभागाच्या तपासणीत मीटरमध्ये कोणताही दोष आढळला नाही
Electricity Bill: प्रशासकीय दिरंगाईचा फटका एका गरीब कुटुंबाला बसला आहे. हे कुटुंब एका मजूराचं आहे. त्यांना वीज बिलाचा झटका मिळाला आहे. घरात केवळ तीन बल्ब आणि दोन पंखे असतानाही या कुटुंबाला तब्बल 4 लाख रुपयांचे वीज बिल पाठवण्यात आले आहे. हे वीज बिल हातात पडल्यानंतर खराती कर्ता पुरूषाला हा धक्का सहन झाला नाही. त्यातच त्यांचा मृत्यू ही झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे, याबाबत तक्रार केल्यानंतर विभागाने मदतीऐवजी 50 टक्के रकमेवर सेटलमेंटचा प्रस्ताव दिला. त्यानंतर मात्र सगळीकडेच संताप व्यक्त केला जा आहे. राजस्थानमधील किशनगड येथे ही घटना घडली.
राजस्थान मध्ये किशनगडजवळ नयागाव हे गाव आहे. या गावात गणेश गुर्जर यांचे घर आहे. गणेश हे मजूर आहेत. त्यांच्या घरी जुलै 2024 मध्ये 3 लाख 28 हजार रुपयांचे बिल आले होते. वेळेत निराकरण न झाल्याने व्याजासह ही रक्कम 3 लाख 92 हजार 533 रुपयांवर पोहोचली. त्यांचे घर हे दोन खोल्यांचेच आहेत. शिवाय घरात बल्ब आणि पंख्या शिवाय काहीच नाहीत. असे असताना इतके बिल कसे आले असा त्यांना प्रश्न पडला होता. शिवाय ऐवढी मोठी रक्कम कशी भरणार याचं ही टेन्शन त्यांना होतं. दोन खोल्यांच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबासाठी ही रक्कम भरणे अशक्य होतं.
विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, दीड वर्षापूर्वी मीटरचे रीडिंग असामान्य आले होते. तपासणीत मीटर 'ओके' असल्याचे आढळले. नियमानुसार 30 ते 50 टक्के रक्कम भरून दाद मागण्याची सोय असताना ग्राहकाने प्रक्रिया पूर्ण केली नाही, असा दावा विभागाने केला आहे. विद्युत विभागाचे सहाय्यक अभियंता जितेंद्र यादव यांनी सांगितले की, मीटरचे रीडिंग खूप जास्त आल्याने त्याची तपासणी करण्यात आली होती. मीटरमध्ये कोणताही दोष आढळला नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
पुढे ते म्हणाले की या प्रकरणात ग्राहकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे 'ग्रीवांस रिड्रेसल' फॉर्म भरून दाद मागणे अपेक्षित होते. ज्यात 30 ते 50 टक्के रक्कम जमा करून सुनावणी घेण्याची तरतूद आहे. असं म्हणत प्रशासनाने आपले हात वर केले. मजुरी करून पोट भरणाऱ्या या कुटुंबाचे वीज कनेक्शनही आता कापण्यात आले आहे. हे कुटुंब अंधारात असून न्यायासाठी दाद मागत आहे. प्रशासकीय चुकीचा फटका एका निष्पाप जीवाला बसल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world