Shri Krishna Janmashtami 2025: भगवान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीचा सध्या देशभर उत्साह आहे. या दिवशी भक्त कृष्णाच्या भक्तीत पूर्णपणे लीन होतात तुम्ही सूरदास, मीरा आणि चैतन्य महाप्रभू यांच्या कृष्ण भक्तीबद्दल ऐकले असेल, परंतु असे काही सामान्य लोकही आहेत, जे कान्हाच्या प्रेमात इतके वेडे आहेत की, सर्व काही सोडून फक्त त्यांच्या भक्तीत लीन होऊ इच्छितात. आज आम्ही तुम्हाला अशा काही भक्तांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी कृष्ण भक्तीमध्ये सर्वांचा त्याग केला.
IPS अधिकाऱ्याने सोडली नोकरी
हरियाणा कॅडरच्या 1998 बॅचच्या आयपीएस अधिकारी भारती अरोरा यांनी 2021 मध्ये अचानक स्वेच्छानिवृत्ती घेतली. यामागे कृष्ण हे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. आता त्या त्यांचे पुढील आयुष्य फक्त कृष्ण भक्तीमध्ये घालवणार आहेत. अंबाला रेंजच्या आयजी पदावर असलेल्या या महिला अधिकाऱ्याच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.
( नक्की वाचा : Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला; दहा थर लागणार का? याची उत्सुकता )
बिहारच्या माजी डीजीपींची कृष्ण भक्ती
आयपीएस अधिकारी आणि बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्या राजीनाम्याची खूप चर्चा झाली. त्यांनी राजकारणात प्रवेश करण्यासाठी नोकरी सोडली होती, परंतु त्यांना राजकारण भावलं नाही. त्यानंतर गुप्तेश्वर पांडे कृष्णाच्या आश्रयाला गेले आणि आज त्यांची वेशभूषा आणि राहणीमान एखाद्या साधूसारखे आहे. ते देशभरात कृष्ण भक्तीवर प्रवचनही देतात.
रशियन कमांडो बनले इस्कॉनचे स्वामी
कृष्णाची भक्ती अशी आहे की, कोणीही त्यात पूर्णपणे लीन होऊ शकते. जो या भक्तीसागरात डुबकी मारतो, तो कान्हाच्या लीलांमध्ये रमून जातो आणि सर्वकाही सोडून फक्त कृष्ण भक्तीतच मग्न राहतो. याचे एक मोठे उदाहरण म्हणजे स्वामी पात्री दास, जे एकेकाळी रशियन सैन्यात कमांडो होते, त्यांचे नाव ओब्लोनकोव होते. जेव्हा एका कृष्णभक्ताने त्यांना 'गीता' भेट दिली, तेव्हा ते इस्कॉनच्या संपर्कात आले. त्यांनी आपली नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी दीक्षा घेतली आणि ते स्वामी पात्री दास बनले. आज पात्री दास हे नेपाळमधील इस्कॉनचे एक मोठे संत आणि प्रचारक आहेत.
( नक्की वाचा : PM Viksit Bharat Rojgar Yojana : देशभरातील तरुणांना कसे मिळणार 15 हजार? कुठे करणार अर्ज... वाचा सर्व माहिती )
डीके पांडा बनले राधा
डीके पांडा या आयपीएस अधिकाऱ्यांचीही देशभर चर्चा झाली. उत्तर प्रदेश कॅडरचे हे अधिकारी अचानक मीराच्या वेशात आले आणि त्यांनी आयजी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी सांगितले की, त्यांना स्वतः भगवान कृष्ण स्वप्नात आले होते, ज्यांनी सांगितले की 'तू माझी राधा आहेस'. पांडा यांनी असेही उघड केले की, त्यांना अनेक वर्षांपूर्वीच याची जाणीव झाली होती, त्यानंतर ते मुलींचे कपडे घालून आणि श्रृंगार करून दरवेळी गुपचूप राधा बनत होते. शेवटी, त्यांनी हे स्वीकारले आणि स्वत:चे पद सोडले.