इंग्लंडचे नवे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याकडे किती संपत्ती? ऐकून हैराण व्हाल

कीर हे इंग्लंडचे नवे पंतप्रधान होणार आहेत. इंग्लंडमध्ये 650 जागा आहेत. बहुमतासाठी 326 जागांची गरज असते.

Advertisement
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

इंग्लडच्या सार्वत्रिक निवडणुकीत ऋषि सुनक यांच्या कंजर्वेटिव पार्टीचा मोठा पराभव झाला. तर लेबर पार्टीने 14 वर्षानंतर सत्तेत जोरदार आगमन केले. लेबर पार्टीच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते कीर स्टार्मर. कीर हे इंग्लंडचे नवे पंतप्रधान होणार आहेत. इंग्लंडमध्ये 650 जागा आहेत. बहुमतासाठी 326 जागांची गरज असते. लेबर पार्टीने जवळपास 400 जागा जिंकत मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे ते सत्ता स्थापन करणार ही आता औपचारिकता राहीली आहे.     

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बीबीसीने दिलेल्या वृत्ता नुसार लेबर पार्टीचे नेतृत्व करणारे सर कीर स्टार्मर हेच पंतप्रधान होणार आहेत. तर दुसरीकडे  वहीं कंजर्वेटिव पार्टीच्या ऋषि सुनक यांनी पराभव मान्य केला आहे. शिवाय देशवासीयांची माफीही मागितली आहे. शिवाय त्यांनी कीर स्टार्मर यांना विजया बद्दल फोन करून शुभेच्छाही दिल्या आहेत. ओपिनियन आणि एक्झिट पोलमध्येही लेबर पार्टीच विजयी होईल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. तो अंदाज निकालानंतर खरा ठरला आहे. या विजया मुळे ऋषि सुनक यांच्या कंजर्वेटिव पार्टी ची  14 ची सत्ता संपली आहे. 
 

पॉलिटिक्स डॉट को डॉट यूके च्या माहिती नुसार 2021/2022 या वर्षात कीर स्टार्मर यांना खासदार म्हणून  £76,961 एवढा पगार मिळाला होता. तर विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांना £49,193 मिळाले होते. ते 2008 ते 2013 पर्यंत लोक अभियोजन निदेशक आणि क्राउन अभियोजन कार्यालयात प्रमुख होते. यासाठी त्यांना मोठा पगार दिला जात होता.  कीर हे एक वकील सुद्धा आहेत.  2020/21 मध्ये त्यांना त्यांच्या पेशाकडून  £21,000 पाऊंड मिळाले होते. 

ट्रेंडिंग बातमी - 'लोणावळा खंडाळा बंद करा, तुम्ही आमच्या पोटावर पाय आणला'

2020 मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे  £10 मिलियन किंमतीची 7 एकर जमिन असल्याचे सांगितले होते. त्यांच्याकडे आणि पत्नीकडे उत्तर लंडनमध्येही एक घर आहे. ते त्यांनी £600,000 पाऊडमध्ये खरेदी केले होते. या घराची किंमत आता  £1 मिलियन येवढी झाली आहे. प्रोलिफिक लंदनच्या नुसार सर कीर यांची संपुर्ण संपत्ती ही जवळपास 7.7 मिलियन पाउंड येवढी आहे. 
 

Advertisement

इंग्लंडच्या पंतप्रधानाना राहण्यासाठी 10 डाउनिंग स्ट्रीटवर घर आणि कार्यलय दिले जाते. तिथूनच ते आपले कामकाज सांभाळतात. शिवाय इंग्लंडच्या पंतप्रधानांना दर महिना 5 लाख 78 हजार रुपये पगार दिला जातो. दर वर्षाच्या पगारा बाबत बोलायचं झालं तर  जवळपास  1 करोड़ 73 लाख 44 हजार रुपये दिले जातात. 

ट्रेंडिंग बातमी - वजन कमी करण्यासाठी काय कराल? 'या' फळाचं करा सेवन 

कीर स्टार्मर यांचे वडील एक टूलमेकर होते. तर आई एक नर्स होती.कीर यांनी रीगेट ग्रामर स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.  बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार शाळेनंतर विद्यापिठात शिक्षण घेणारे ते घरातले एकमेव सदस्य होते. त्यांनी पुढे ऑक्सफोर्ड विद्यापिठातून कायद्याची पदवी घेतली. इंग्लंडमध्ये 2 सप्टेंबर 1962 साली त्यांचा जन्म झाला. 

Advertisement