- उत्तर प्रदेश के बहराइच में एक घर में छह लोगों के संदिग्ध रूप से जलने से मौत का मामला सामने आया है
- मरने वालों में दो मासूम बच्चे भी शामिल हैं, पुलिस इस घटना की कई एंगल से जांच कर रही है
- पुलिस यह भी जांच कर रही है कि कहीं यह हत्या कर आग लगाकर मौत का रूप देने की साजिश तो नहीं है
उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातून एक अत्यंत भयंकर घटना समोर आली आहे. निंदूर पुरवा गावातील एका अर्धवट जळालेल्या घरात सहा जणांचे जळालेले मृतदेह आढळले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवली असून, पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
जळालेल्या घरातून जे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, त्यामध्ये घराचे मालक विजय, त्यांच्या दोन मुली, त्यांची पत्नी आणि इतर दोन लोकांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच मोठी गर्दी जमा झाली होती. स्थानिक लोकांनी या घटनेमागे सामूहिक हत्या करून नंतर घरात आग लावल्याची भीती व्यक्त केली आहे. मृतांच्या निश्चित कारणाबद्दल अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत.
(नक्की वाचा- Madhya Pradesh News: सर्दी, ताप अन् अचानक लघवी थांबली; 6 चिमुकल्यांचा मृत्यू, 2 कफ सिरपवर बंदी)
घटनास्थळी भेट दिल्यानंतर आयजी अमित पाठक यांनी घटनेची माहिती दिली. पाठक यांनी सांगितले की, 'आरोपीसह सहा लोकांचा मृत्यू झाला आहे.' या आगीत प्राणी आणि एक ट्रॅक्टर देखील जळाल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, या प्रकरणातील सर्व पैलूंची बारकाईने चौकशी केली जात आहे.
स्थानिक लोकांच्या शंकेनुसार, सामूहिक हत्या करून पुरावा मिटवण्यासाठी घरात आग लावण्यात आली असण्याची शक्यता आहे. पोलीस एका दुसऱ्या बाजूनेही तपास करत आहेत. घरात पूजा करत असताना अचानक आग लागली आणि त्यात सापडून सर्वांचा मृत्यू झाला असावा, असाही पोलिसांना संशय आहे.
(नक्की वाचा- Heart Attack VIDEO: नाचता नाचता कोसळली, नवऱ्यासमोरच नवविवाहितेने सोडला जीव; मन सुन्न करणारा व्हिडीओ)
पोलीस सध्या मृतांच्या कुटुंबियांशी आणि त्यांच्या शेजाऱ्यांशीही चौकशी करत आहेत. तसेच घरातून काही पुरावे मिळतात का, यासाठी घराचीही तपासणी केली जात आहे. तपास पूर्ण होईपर्यंत पोलीस कोणत्याही निष्कर्ष काढण्याची घाई करत नाहीत. तपास पूर्ण झाल्यावरच मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होईल.