Instagram इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ; घात की अपघात? चर्चांना उधाण

influencer Kamal Kaur : कमल कौर यांना याआधी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, अशीही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. कमल कौर लुधियानाची रहिवासी होती आणि तिच्या रील्समुळे ती अनेकदा चर्चेत आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

Influencer Kamal Kaur : पंजाबची प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कमल कौर उर्फ ​​कांचन कुमारी हिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भटिंडा येथील एका रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये कारमध्ये कमल कौरचा मृतदेह आढळला आहे.  कमल कौरचा मृतदेह अनेक दिवसांपासून कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.

कमल कौर यांना याआधी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, अशीही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. कमल कौर लुधियानाची रहिवासी होती आणि तिच्या रील्समुळे ती अनेकदा चर्चेत आली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स होते.

 Kamal Kaur बद्दल पोलिसांनी काय सांगितलं? 

पोलीस अधीक्षक नरेंद्र सिंह यांनी याबाबत म्हटलं की, आम्हाला माहिती मिळाली होती की आदेश हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये एक कार उभी आहे आणि या कारमधून दुर्गंधी येत आहे, जेव्हा आमची टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना कारच्या मागच्या सीटवर एका महिलेचा मृतदेह आढळला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नाही.

परंतु आम्ही तपास केला तेव्हा असे आढळून आले की महिलेचे नाव कांचन कुमारी उर्फ ​​कमल कौर आहे. ती लुधियानाची रहिवासी आहे. तिचे वय सुमारे 30 वर्षे आहे. कमल 9 तारखेला घरातून निघून गेली होती. तिने तिच्या कुटुंबाला सांगितले होते की ती भटिंडा येथे एका प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी होणार आहे. मात्र त्यानंतर तिचा कुणाशीही संपर्क झाला नाही, अशी माहितीही पोलिसांना दिली.

Advertisement

हत्या झाल्याचा संशय

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसते की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कलमची हत्या केली आहे आणि मृतदेह येथे गाडीत सोडून पळून गेला. आम्ही कुटुंबीयांशी संपर्क साधला, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कमलची हत्या कुणी केली आणि का केली?  गाडी येथे कुणी आणली? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. 

Topics mentioned in this article