Omar Abdullah: 'दिलेला शब्द पाळला, 'तुमच्यामुळेच सुरक्षेची भावना..' काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची PM मोदींवर स्तुतीसुमनं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री  ओमर अब्दुल्ला, केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी  मुख्यमंत्री आणि इंडिया आघाडीचे सहयोगी सदस्य ओमर अब्दुला यांचे तोंडभरुन कौतुक केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

जम्मू- काश्मीर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  जम्मू काश्मीरमधील झेड मोऱ्ह बोगद्याचे आज ( 13 जानेवारी 2025)  लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री  ओमर अब्दुल्ला, केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी  मुख्यमंत्री आणि इंडिया आघाडीचे सहयोगी सदस्य ओमर अब्दुला यांचे तोंडभरुन कौतुक केले. तुमच्या प्रयत्नांमुळेच लोकांमध्ये सुरक्षेची भावना आहे, असं ते म्हणाले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले ओमर अब्दुल्ला?

'सोनमर्ग बोगद्याची इथल्या लोकांनी बराच काळ वाट पाहिली आहे. थंडीत लोकांना सोनमर्ग सोडून खाली येण्याची गरज नाही. 12 महिने येथे पर्यटन असेल विंटर टुरिझमसाठी आम्ही येथे विकास करू शकू.  पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे सीमावर्ती भागामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, त्याचे दुर्गम भागात चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत. आपण कल्पनाही करू शकत नाही, इतके पर्यटक या दुर्गम भागात येत आहेत,' असं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले.

तसेच 'आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी काही गोष्टी सांगितल्या, त्या ऐकल्यानंतर लोकांना त्यांच्या शब्दांवर अधिक विश्वास बसायला लागला आहे. 15 दिवसांत जम्मू काश्मीरचा पंतप्रधानांचा दुसरा दौरा आहे. अशा प्रकल्पांमुळे दिल की दुरी नाही तर दिल्ली की दुरीही कमी होते. पंतप्रधानांनी आश्वासन दिल्याप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या. त्यामुळे मी येथे मुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो,' असंही मुख्यमंत्री म्हणाले.

नक्की वाचा - India Alliance: इंडिया आघाडीत खरोखर फूट पडली आहे का? पडद्यामागे काय घडतंय?

  'निवडणुकीत कुठेही अनुचित घटना घडली नाही. याचे श्रेय तुम्हाला, तुमच्या सहकाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाला जाते. तिसरी बाब म्हणजे तुम्ही पूर्ण राज्याचा दर्जाबाबत विधान केले होते, मलाही लोक याबाबत विचारतात. मी लोकांना हेच सांगतो की पंतप्रधानांनी चार महिन्यात निवडणुकांचे आश्वासन पूर्ण केले होते आणि ते तिसरे आश्वासनही लवकरच पूर्ण करतील. मी मनापासून पंतप्रधानांचे आभार मानतो, कारण इतक्या थंडीतही ते इथे आले, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाचेही कौतुक केले.