Actor Mahesh Babu : सुपरस्टार महेश बाबूला ईडीचं समन्स, 27 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश

Actor Mahesh Babu : अभिनेता महेश बाबू याला आलेले ईडीचे हे समन्स रिअल इस्टेट गुंतवणूकदारांसोबतच्या फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

 Mahesh Babu summoned by ED : दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू याला ईडीने समन्स पाठवलं आहे. या समन्समध्ये महेश बाबूला 27 एप्रिल रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हैदराबादमधील रिअल इस्टेट कंपन्यांमधील मनी लाँड्रिंग चौकशीसंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेता महेश बाबूला हे समन्स बजावलं आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिअल इस्टेट गुंतवणूकदारांसोबत झालेल्या कथित फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी अनेक ठिकाणी छापे टाकले. यात सुराणा ग्रुप आणि साई सूर्या डेव्हलपर्सवर ही कारवाई करण्यात आली होती. सिकंदराबाद, जुबली हिल्स आणि बोवेनपल्ली येथील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

महेश बाबू ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

पीएमएलए अंतर्गत चौकशी रिअल इस्टेट प्रकल्प वेळेवर पूर्ण न करण्याच्या आरोपांशी जोडलेली आहे. साई सूर्या डेव्हलपर्सचे मालक कंचरला सतीश चंद्र गुप्ता यांच्यावर 'ग्रीन मीडोज' नावाच्या प्रकल्पात कथित त्रुटी आढळल्याबद्दल पोलिस चौकशी सुरू आहे. अभिनेता महेश बाबू या प्रकल्पाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होते. तथापि, त्याच्यावर अद्याप कोणतेही आरोप नाहीत. 

हैदराबादमधील वेंगल राव नगर येथील कंचरला सतीश चंद्र गुप्ता आणि त्यांच्या कंपनीविरुद्ध स्थानिक पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

Topics mentioned in this article