Train Attacked : झांशीहून प्रयागराजला निघालेल्या ट्रेनवर दगडफेक; हरपालपूर रेल्वे स्टेशनवर काय घडलं?

दगडफेक आणि तोडफोडीमुळे प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. प्रवाशांनी सांगितले की, स्थानकात उपस्थित असलेल्या जमावाने अचानक दगडफेक आणि हल्ला करण्यास सुरुवात केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
महाकुंभ जा रही ट्रेन में तोड़फोड़ और पथराव

झाशीहून प्रयागराज महाकुंभसाठी निघालेल्या ट्रेनवर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. दगडफेक करुन ट्रेनची तोडफोडही करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झाशीमधील हरपालपूर रेल्वे स्टेशनमधील ही घटना आहे. यावेळी प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. हल्लेखोरांनी ट्रेनमध्ये घुसण्याचा देखील प्रयत्न केला. ट्रेनचा दरवाजा आणि खिडक्यांचही मोठं नुकसान या हल्ल्यात झालं आहे. सोमवारी रात्री 10 ते 11 च्या दरम्यान हा प्रकार घडला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे प्रकरण?

झाशीहून प्रयागराजला जाणारी एक्सप्रेस हरपालपूर रेल्वे स्थानकावर आली. त्यावेळी मोठ्या संख्येने प्रवासी येथे जमले होते. मात्र ट्रेन आधीच भरुन आली असलेल्या आतील प्रवाशांनी ट्रेनचे दरवाजे बंद केले. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांना आत जाता आले नाही. यावेळी प्लॅटफॉर्मवरील संतप्त प्रवाशांनी ट्रेनवर दगडफेक आणि तोडफोड सुरू केली. 

(नक्की वाचा- Viral Post : Zepto कडून iphone युजर्सवर अन्याय? Android च्या तुलनेने वस्तू महाग विकल्या जात असल्याच आरोप)

दगडफेक आणि तोडफोडीमुळे प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. प्रवाशांनी सांगितले की, स्थानकात उपस्थित असलेल्या जमावाने अचानक दगडफेक आणि हल्ला करण्यास सुरुवात केली. प्रयागराजला महाकुंभ स्नानासाठी जाणाऱ्या ट्रेनमध्ये सर्व महिला आणि लहान मुले उपस्थित होती.

(नक्की वाचा-  Modi-Trump Phone Call : PM नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा प्लॅन ठरला, ट्रम्प यांनी सांगून टाकला)

काहींनी दगडफेक करून ट्रेनमधील प्रवाशांना इजा पोहोचवण्याचाही प्रयत्न केला. जवळपास 8-10 जण असल्याचं सांगितलं जात आहे. सर्वांनी तोंडाला कपडा बांधला होता. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Advertisement

हल्लेखोरांनी ट्रेनमध्ये घुसण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र आतील प्रवाशांनी वेळेत ट्रेनचे दरवाजे बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.  घटनेनंतर काही वेळातच ट्रेन पुढे रवाना करण्यात आली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.