Zepto Pricing Controversy: ऑनलाईन शॉपिंग अॅपवर एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळ्या किंमती असतात का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. अलीकडेच बंगळुरूमधील एका महिलेने झेप्टोवर (Zepto) आयफोन आणि अँड्रॉइड यूजरसाठी एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या किंमती दाखवल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे झेप्टोवर आयफोन आणि अँड्रॉइड असा भेदभाव केल्याचा आरोप होत आहे.
काही दिवसांपूर्वी Uber आणि Ola यांच्यावर देखील असेच आरोप करण्यात आले होते की वेगवेगळ्या स्मार्टफोन्सवर एकाच राइडसाठी वेगवेगळ्या किंमती दाखवतात. झेप्टोबाबतही असाचा काहीसा प्रकार समोर आला आहे. ज्याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
(नक्की वाचा- Crime News: वारंवार OYO रुम बुक केल्याने संशय आला, जोडप्याचा कांड पाहून पोलिसही हादरले; दोघे अटकेत)
पोस्ट पाहा
पूजा छाबर असं या बंगळुरूच्या महिलेचे नाव असून तिने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. पूजाने अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीवर एकाच वस्तूच्या किमतीची तुलना केली आणि आयफोनवर त्याच वस्तूची किंमत खूप जास्त असल्याचे आढळले. तर तीच वस्तू अँड्रॉइड फोनवर स्वस्त दरात उपलब्ध होती.
(नक्की वाचा- Mahakumbh 2025 : महाकुंभमध्ये मोनालिसाने 10 कोटी कमावले, दाव्यामागील सत्य काय आहे? )
पूजाने आयफोन आणि अँड्रॉइड फोन समोर ठेवून तेथील एकाच वस्तूच्या किमतींची तुलना केली. त्यावेळी तिला आढळलं की, 500 ग्रॅम द्राक्षांची किंमत Android डिव्हाइसवर 65 रुपये, तर तीच द्राक्षे iPhone वर 146 रुपयांना उपलब्ध होती. आधी तिला योगायोग वाटला, पण नंतर तिने शिमला मिरचीची किंमत पाहिली तर Android मध्ये 37 रुपये होती, तर iPhone मध्ये त्याची किंमत 69 रुपये होती. "Zepto तुम्ही असं का करत आहात?" असं कॅप्शन ठेवत पूजाने ही पोस्ट शेअर केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world