Shocking news: भटक्या कुत्र्यानं 4 वर्षाच्या मुलाला जबड्यात पकडलं, 100 मिटर फरफटत नेलं, पुढे जे घडलं ते ऐकून..

दोन्ही डोळ्यांच्या वर आणि हाताच्या बोटांना कुत्र्याने अक्षरशः ओरबाडले होते. 

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • राजस्थानच्या माचा गावात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
  • एका ४ वर्षीय बालकावर कुत्र्याने हल्ला करून त्याला जबड्यात पकडून १०० मीटरपर्यंत फरफटले आहे
  • बालकाच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या असून त्याला अलवर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

भटक्या कुत्र्यांची दहशत सगळीकडेच पाहायला मिळत आहे. राजस्थानच्या खैरथल-तिजारा जिल्ह्यातील माचा गावात भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. इथं रस्त्यावर फिरणं ही कठीण झालं आहे. या गावात नुकतीच एक घटना घडली. त्यात भटक्या कुत्र्यांमुळे एका चिमुरड्यांचा जिव गेला असता. गुरुवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास घराबाहेर खेळणाऱ्या असवाल नावाच्या 4 वर्षीय बालकावर एका हिंसक कुत्र्याने अचानक हल्ला केला. यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत.  

हा हल्ला इतका भीषण होता की, कुत्र्याने मुलाला जबड्यात पकडले. त्यानंतर त्याला तब्बल 100 मीटरपर्यंत फरफटत नेले. हे सर्व त्या मुलाच्या आई समोरच झाले. त्यांनी हे पाहीले. मग आई आणि शेजाऱ्यांनी आरडाओरडा केला. या गोंधळामुळे कुत्रा ही घाबरला. कुत्र्याने त्या मुलाला सोडले आणि तिखून धुम ठोकली. मात्र तोपर्यंत मुलाच्या डोक्याला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या होत्या. दोन्ही डोळ्यांच्या वर आणि हाताच्या बोटांना कुत्र्याने अक्षरशः ओरबाडले होते. 

नक्की वाचा - Ajit pawar News: अजित पवार जिवंत, विमानात बॉम्ब ते 50 कोटींचा विमा! शिंदेंच्या शिलेदाराचे मोठे वक्तव्य

प्राथमिक उपचारानंतर मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अलवर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या डोक्यावर अनेक टाके पडले आहेत. गावात अजूनही तो हिंसक कुत्रा मुक्तपणे वावरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, किशनगड बास नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल अग्रवाल यांनी सांगितले की, भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे कंत्राट देण्यात आले असून तक्रार येताच कारवाई केली जाते. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

नक्की वाचा - 'दादांच्या पायातून धुर येत होता, एक जण खाली उतरत होता' काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' प्रसंग

या कुत्र्याच्या हल्ल्यात असवालच्या डोक्याला आणि हाताला खोलवर जखमा झाल्या आहेत. त्याच्या डोळ्यांच्या वरचा भाग कुत्र्याने पूर्णपणे चावून टाकला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या मुलाला तातडीने अलवर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करून टाके घालण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर भितीचे वातावरण आहे. आमच्या मुलांचे रक्षण कोण करणार?" असा संतप्त सवाल गावातील पालक करत आहेत. हिंसक कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. 

Advertisement