अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. पण त्यांच्या मृत्यूची चर्चा अजून ही थांबलेली नाही. सोशल मीडियावर तर अजित पवार जिवंत असल्याची चर्चाही चांगलीच रंगली आहे. शिवाय काही जण हा अपघात नसून घातपात असल्याचं ही सांगत आहेत. त्यामुळे अजित पवारांचे चाहते आणि समर्थक यांच्या मोठ्या प्रमाणात संभ्रमाचं वातावरण दिसत आहे. अशाच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर पुर्ण विराम देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
संजय शिरसाट म्हणाले की अजित पवारांच्या मृत्यूबाबत जे आरोप, दावे- प्रतिदावे केले जात आहेत त्याची चौकशी सुरू आहे. अजित पवार जिवंत आहेत असा दावा केला जातोय. यावर पोलीसांनी आक्षेप नोंदवायला हवा असं ते म्हणाले. अजितदादा जाण्याचे दुःख कमी आणि आरोपांच्या फैरी जास्त आहेत असंही ते म्हणाले. अजित पवार ज्या विमानात होते त्या विमानाचा 50 कोटींचा विमा होता असे कळते. आता पायलटचा विमा 50 कोटीचा होता असे समजते असं ही शिरसाट यावेळी म्हणाले.
पण याची ही चौकशी जरूर होईल.याबाबत सीआयडी चौकशी करत आहे. आणखी काही संस्था चौकशी करत असेल. पण या सर्वासाठी अवधी लागेल. नंतर सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण समोर येईल असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार जिवंत असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्याचा ही शिरसाट यांनी समाचार घेतला. सोशल मीडियावर कधी काय येईल याचा भरोसा राहिला नाही असं ते म्हणाले. काय खरं काय खोटं याचा नेम सोशल मीडियावर राहीलेला नाही असं ही त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर काय चर्चा घडतील. कशाच्या बाबतीत घडतील याचा नेम नाही. त्यामुळेच सोशल मीडियाचा लोभ जनतेला कन्फ्युज करत आहे. अजित पवारांच्या मृत्यूबाबत सर्व खुलासा झालेला आहे. त्यांची अंत्ययात्रा झाली आहे. अजित पवारांचा पुतळा बसवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात ते जिवंत आहेत अशा बातम्या कन्फ्युज करत आहे. काहींनी तर हा नवीन शोध लावला आहे अशा शब्दात त्यांनी संबंधीतांवर टीका केली आहे. या चर्चा थांबल्या पाहीजेत असं ही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world