Earthquake in Delhi : दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. गुरुवारी सकाळी 9.04 वाजता अचानक हादरे बसले. भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी असल्याचा अंदाज आहे.
भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी असल्याचा अंदाज आहे. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद येथे सुमारे 10 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसादरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळी जमीन हादरली.
भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना आणि घरी बसलेल्या सर्वांना ते जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीपासून थोड्या अंतरावर असलेल्या हरियाणातील झज्जरमध्ये होते. दिल्लीसह, हरियाणातील फरीदाबाद, गुरुग्राम आणि जिंद सारख्या काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यावेळी भूकंपाचे केंद्र दिल्लीच्या अगदी जवळ असलेल्या हरियाणातील झज्जर येथे होते.
सुदैवाने अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. मात्र, भूकंपानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. काही ठिकाणी लोक घराबाहेर पडले. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.