Student Clash : कर्नाटकच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये चपात्यांवरुन 2 दिवस राडा, 8 विद्यार्थी जखमी

कर्नाटकच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या मुलांच्या वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या चपातीच्या गुणवत्तेवरून हा वाद सुरु झाला. दोन दिवस कॅम्पसमध्ये हाणामारी झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins

कर्नाटकच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील हॉस्टेलमध्ये चपातीवरुन विद्यार्थ्यांचे दोन गट आपापसात भिडले. या राड्यात 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांमधील वाढता संघर्ष पाहता विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कर्नाटकच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या मुलांच्या वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या चपातीच्या गुणवत्तेवरून हा वाद सुरु झाला. दोन दिवस कॅम्पसमध्ये हाणामारी झाली आणि त्यात किमान आठ पदव्युत्तर विद्यार्थी जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर भारतीय विद्यार्थ्यांनी मशीनने बनवलेल्या चपात्या मागितल्या. तर दक्षिण भारतीय विद्यार्थ्यांनी हाताने बनवलेल्या चपात्या मागितल्या. किरकोळ मतभेदातून सुरू झालेले हे भांडण लवकरच हाणामारीत रूपांतरित झाले. आळंद तालुकमधील कडगंची गावात वसतिगृहाच्या डायनिंग हॉलमध्ये हा सगळा प्रकार घडला. 

(नक्की वाचा-  पुण्यात 35 कोटींच्या 100 शववाहिका धूळ खात; तानाजी सावंत यांच्या काळातील खरेदीत गोंधळ?)

या हाणामारीत जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पोलिसांनी सांगितले की काही विद्यार्थी त्या रात्री वसतिगृहाच्या अनेक खोल्यांमध्ये घुसले आणि इतर गटातील विद्यार्थ्यांना धमकावले. शनिवारी सकाळी, लायब्ररीच्या इमारतीबाहेर दुसऱ्यांदा झालेल्या संघर्षात आणखी 7 विद्यार्थी जखमी झाले. ज्यामुळे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना कॅम्पसमध्ये बोलावले.

Advertisement

(नक्की वाचा-  Dhanashree Varma Post : युजवेंद्र चहल-RJ महवशचे फोटो व्हायरल, धनश्री वर्माची पोस्ट चर्चेत, म्हणाली...)

विद्यार्थ्यांनी पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी केल्याने परिस्थिती आणखी चिघळली. कलबुर्गीचे एसपी अद्दुरु श्रीनिवासुलू यांनी TOI ला सांगितले की, पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या जमावाला पांगवलं. पोलीस पथकाने दोन्ही बाजूंच्या काही विद्यार्थ्यांना अटक केली. तसेच अधिक हिंसाचार झाल्यास कारवाईचा इशारा दिला.

Topics mentioned in this article