- जहानाबादच्या अंकित कुमारने बिहार लोकसेवा आयोगच्या 70 व्या संयुक्त स्पर्धा परीक्षेत DSP पदासाठी यश मिळवले आहे
- अंकित कुमारच्या वडिलांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्याचे बालपण अत्यंत धोकादायक नक्षलग्रस्त भागात गेले
- IIT BHU मधून इंजिनिअरिंग पदवी घेतल्यानंतर अनेक खाजगी नोकऱ्यांच्या ऑफर्स त्यांना होती.
स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिलेला लढा कधीही वाया जात नाही असं बोललं जातं. पण ते सिद्ध करणारं जिवंत उदाहरण समोर आलं आहे. जहानाबादच्या अंकित कुमारने हे करून दाखवलं आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर त्याने मात केली. अंकितने BPSC 2024 म्हणजेच बिहार लोकसेवा आयोग च्या 70 व्या संयुक्त स्पर्धा परीक्षेत जबरदस्त यश मिळवलं आहे. या परिक्षेत पास झाल्यानंतर तो DSP म्हणजेच पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली आहे. पण या पदापर्यंत पोहोचण्या मागे त्याचा संघर्ष आहे. त्याग आहे. शिवाय वडीलांचे बलिदान ही आहे. त्याच्या स्टोरी वाचाल तर तुम्हाला तुमचे आश्रू आवरणं कठीण जाईल.
अंकित कुमारच्या वडिलांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. अंकित यांचे लहानपण नक्षलग्रस्त भागातच गेले. संपूर्ण गावार भीतीचं सावच होतं. मागासले पणा पण पाचवीला पुजलेला होता. अशा वातावरणात धैर्याला संघर्षाची जोड देत त्याने आपल्या यशाची कथा स्वत:च लिहीली आणि स्वत:च साकार केली. ती खऱ्या अर्थाने थक्क करणारी आहे. अंकित कुमारचा जीवनप्रवास आव्हानांनी भरलेला म्हणावा लागेल. 2015 मध्ये दहशतवाद्यांनी त्यांचे वडिल रजनीश शर्मा यांची हत्या केली. या धक्क्याने संपूर्ण कुटुंब कोलमडून गेले होते.
मखदुमपुरच्या मकरपुरसारख्या अत्यंत नक्षलग्रस्त भागात ते लहानाचे मोठे झाले. तिथे सतत गोळीबार आणि रक्तपात होत होता. याच वातावरणात अंकित यांचे बालपण गेले. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या काकांनी म्हणजेच नीरज शर्मा यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली होती. अंकितला पुढील शिक्षणासाठी 'गया' येथे पाठवले. त्यानंतर अंकित यांनी कधी मागे वळून पाहीले नाही. ते एक एक पायरीवर चढत गेले. आपलं लक्ष गाठणं हेच त्यांनी आपलं ध्येय ठेवलं. त्यातून झापाटून त्यांनी अभ्यास केला.
अंकित लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. 2018 मध्ये त्यांनी गया येथील DAV शाळेतून 10 वी आणि नंतर मॉडर्न अकॅडमीमधून 12 वी पूर्ण केली होती. पहिल्याच प्रयत्नात JEE परीक्षा उत्तीर्ण ते झाले होते. त्याने नामांकित IIT BHU (वाराणसी) मधून 2024 मध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. आयआयटीमधून उत्तीर्ण झाल्यावर त्याला अनेक बड्या खाजगी कंपन्यांकडून कोट्यवधींच्या नोकऱ्यांच्या ऑफर्स होत्या आल्या होत्या. मात्र, कॉर्पोरेट क्षेत्रात जाण्याऐवजी त्याने प्रशासकीय सेवेत जाऊन देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने प्रयत्न केले. शेवटी त्यात यश ही मिळवले.
अंकितने कोणते ही कोचिंग क्लास लावले नव्हते. त्या शिवाय त्याने हे यश मिळवले आहे. केवळ 'सेल्फ स्टडी'वर त्याने लक्ष केंद्रीत केले होते. लायब्ररीत तासनतास अभ्यास तो करत होता. त्यानंतर त्याने ही परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात 70 व्या BPSC परीक्षेत त्याने संपूर्ण बिहारमध्ये 274 वा क्रमांक पटकावला. त्याची DSP पदासाठी निवड झाली. जेव्हा त्याने फोनवरून आई सुनीता देवी यांना ही बातमी दिली, तेव्हा त्यांना सुखद धक्का बसला. त्यांना आपले आनंद आश्रू रोखता आले नाहीत.