सिद्धार्थ सक्सेनाचं आयुष्य एकाच दिवसात बदललं आहे. त्याने असं काही करुन दाखवलं जे खूप कमी लोक करू शकतात. IIT कानपूरचे माजी विद्यार्थी आणि मर्लिनचे सहसंस्थापक सिद्धार्थ सक्सेना याने सांगितलं की, त्याने एकाच दिवसात तब्बल ८० लाख अमेरिकन डॉलर म्हणजे ७७ कोटी रुपये कमावले आणि अवघ्या वयाच्या २६ व्या वर्षी करोडपती झाला. त्यामुळे भारतातील उद्यमींमध्ये त्याची जागा निश्चित झाली आहे.
कंटेन्ट क्रिएटर विराज अलासह नुकत्याच झालेल्या एका अनौपचारिक मुलाखतीत त्याने आयआयटी कानपूरचा माजी विद्यार्थी ते एक यशस्वी एआय उद्यमी होण्यापर्यंतच्या प्रवासाविषयी सांगितलं. आपल्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगताना सिद्धार्थने सांगितलं की, आयआयटी कानपूरचा कम्प्युटर सायन्स प्रोग्राम भारतातील सर्वात कठीण इंजिनियरिंग कोर्सपैकी एक आहे. त्याने दावा केला आहे की, यामध्ये प्रवेश मिळवलं हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळविण्यापेक्षा अनेक पटीने कठीण आहे.
प्रवासाला सुरुवात कशी झाली?
सिद्धार्थ याने सांगितलं की, २०१९ मध्ये पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एंटरप्रेन्योरशिपमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी एनवेस्टनेट, योदली, वधवानी, एआय, फिनलँडच्या आल्टो विद्यापीठ आणि जुमियो कॉर्पोरेशनमध्ये विविध भूमिकेच्या माध्यमातून मशीन लर्निंगमध्ये शिक्षण घेतलं.
एकाच दिवसात ७७ कोटी कमावले...
जेव्हा त्यांच्या सर्वात मोठ्या आर्थिक यशाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, मी एकाच दिवसात तब्बल ८० लाख अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास ७७ कोटी रुपये कमावले. यामुळे ते एका रात्रीत करोडपती झाले. जेव्हा मुलाखतीदरम्यान त्यांनी ही बाब सांगितलं तेव्हा ते चर्चेत आले.
स्वत:चं स्टार्टअप सुरू केलं...
२०२२ मध्ये सिद्धार्थने आपल्या आयआयटी कानपूरचे सोबती प्रत्युष राज आणि सिरसेंदू सरकारसह मिळून मर्लिन नावाचं एआय स्टार्टअप सुरू केलं. हे एक एआय आधारित क्रोम एक्स्टेंशन आहे. जे लोकांची काम करण्याची क्षमता वाढविण्यास मदत करते. वृत्तांनुसार, मर्लिन चांगली प्रगती करीत आहे आणि याचं मूल्य तब्बल ५० मिलियन डॉलरपर्यंत पोहोचलं आहे. सक्सेना हे थाइन नावाचं अन्य एक एआय उद्यमीचे सहसंस्थापकही आहेत.
सक्सेना यांना वाटतं, यशस्वी उद्यमी होण्यासाठी केवळ तंत्रज्ञानचं नाही, तर योग्य विचारही आवश्यक आहे. त्याच्यानुसार, लोकांचा मर्यादित विचार सोडून मोठी संधी पाहणे आणि जोखिम शहाणपणाने घेण्याची मानसिकता अंगीकारली पाहिजे