जाहिरात

Success Story: परंपरा जपली अन् स्वप्नही गाठलं! 7 वर्षे पदराआड राहून अभ्यास केला, थेट जज झाल्या, आता लोक...

2021 पासून त्यांनी न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. 2022 मध्ये पहिल्या प्रयत्नात त्या मुलाखतीपर्यंत पोहोचल्या. पण निवड झाली नाही.

Success Story: परंपरा जपली अन् स्वप्नही गाठलं! 7 वर्षे पदराआड राहून अभ्यास केला, थेट जज झाल्या, आता लोक...
  • राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील दीपू कंवर यांनी सामाजिक बंधने पार करून न्यायाधीश होण्याचे स्वप्न पूर्ण केले
  • दीपू यांनी लग्नानंतरही घूंघट ठेवून एलएलबी आणि एलएलएम पूर्ण केले आणि शिक्षणात सातत्य ठेवले
  • त्यांचे पती आणि सासरच्या मंडळींनी घरकामातून सवलत देऊन अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Civil Judge Deepu Kanwar Success Story: संघर्ष, चिकाटी, जिद्द या जोरावर कोणती ही गोष्ट साध्य करता येते. त्यातून आपल्या स्वप्नांना गवसणी घालता येते. अनेक महिला तर लग्नानंतर आपली स्वप्न सोडून देतात. पण काही महिला या जिद्दीनं लग्नानंतर ही आपलं स्वप्न पूर्ण करतात. विशेष म्हणजे आपली संस्कृती परंपरा, संस्कार जोपासत ते हे यश संपादीत करतात. अशीच एक सक्सेस स्टोरी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील जालीपा गावात समोर आली आहे. इथं  दीपू कंवर यांनी सामाजिक बंधने आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत न्यायाधीश होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशाने संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतूक होत आहे. शिवाय त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  

दीपू कंवर  लग्नानंतर घूंघट (पदर) घेऊन घर सांभाळत होत्या. त्याच दीपू आता 'गुजरात न्यायालयात दिवाणी न्यायाधीश' (Civil Judge) म्हणून रुजू होणार आहेत. गुजरात न्यायिक सेवा परीक्षेत त्यांनी 79 वी रँक मिळवून हे यश संपादन केले आहे. दीपू यांचा विवाह 2019 मध्ये लोकेंद्र सिंह यांच्याशी झाला. तेव्हा त्या एलएलबीच्या द्वितीय वर्षात शिकत होत्या. लग्नानंतरही त्यांनी आपले शिक्षण थांबवले नाही. त्यांच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी त्यांना अभ्यासासाठी घरकामातून सवलत दिली. घूंघटच्या परंपरेचे पालन करत असतानाच त्यांनी एलएलबी आणि त्यानंतर एलएलएम पूर्ण केले.

नक्की वाचा - Trending News: 33 वर्षांनंतर भाऊ-बहिणीची गळाभेट! चित्रपटाला लाजवेल अशी सत्यकथा, कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी

न्यायाधीश होण्याचा प्रवास सोपा नव्हता. 2021 पासून त्यांनी न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. 2022 मध्ये पहिल्या प्रयत्नात त्या मुलाखतीपर्यंत पोहोचल्या. पण निवड झाली नाही. 2023 मध्ये मुख्य परीक्षेत अपयश आले. मात्र, हार न मानता 2025 मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि आज त्या संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरल्या आहेत. लग्नानंतर दीपू यांनी घर सांभाळावे अशी परिस्थिती असताना, त्यांचे पती लोकेंद्र सिंह यांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. सासरच्या मंडळींनीही दीपू यांना लेकीप्रमाणे वागवले आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी घरच्या कामातून मुक्त केले. 

नक्की वाचा - Trending News: प्लास्टिक बाटली द्या आणि बक्षीस मिळवा! कचरा दिल्यावर मिळतोय रिवॉर्ड, काय आहे ही अनोखी मोहीम?

घूंघटमध्ये राहूनच त्यांनी कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण केले आणि अभ्यासाचा सराव सुरू ठेवला. शिवाय त्यांनी यशाला ही गवसणी घातली आहे. दीपू यांना पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. 2025 च्या परीक्षेत 79 वा क्रमांक पटकावत त्यांनी आपला संघर्ष सार्थ ठरवला. "जर कुटुंबाची साथ असेल, तर कोणतीही स्त्री अशक्य गोष्ट शक्य करू शकते," असा संदेश दीपू यांच्या यशातून मिळत आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे. शिवाय कुटुंबीय ही आपल्या सुनेच्या कामगिरीवर भलतेच खुश आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com