Success Story: 10 दिवसात नशीब बदलले! शेतकऱ्यांच्या एका नाही तर दोन्ही मुलांनी जे केले, ते पाहून म्हणाल...

दोन्ही भावांच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर परिस्थितीवर मात करता येते. याचे ज्वलंत उदाहरण राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातून समोर आले आहे. येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील दोन भावांनी अवघ्या 10 दिवसांच्या अंतराने सरकारी नोकऱ्या मिळवल्या. या दोन्ही भावंडांनी आपल्या कुटुंबाचे नशीब बदलून टाकले आहे. सदापूर गावचे रहिवासी असलेले शेतकरी गुमान गुर्जर यांच्या दोन्ही मुलांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. त्यांच्या कुटुंबाच्या मागील 7 पिढ्यांमध्ये कोणीही सरकारी नोकरीत नव्हते.

गुमान गुर्जर यांच्या मते, जून 2026 हा महिना त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा ठरला आहे असं त्यांनी सांगितलं. 1 जून रोजी त्यांचा लहान मुलगा अर्जुन गुर्जर याची भारतीय हवाई दलाच्या (IAF) ग्रुप 'एक्स'मध्ये एअरमन म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर अवघ्या 10 दिवसांनी, म्हणजेच 11 जून रोजी मोठा मुलगा धर्मराज गुर्जर याने राजस्थान शिक्षक भरती परीक्षेत यश मिळवून शिक्षक पदाला गवसणी घातली आहे. सध्या अर्जुनचे वय 18 वर्षे आणि धर्मराजचे वय 23 वर्षे आहे. अर्जुन हा त्याच्या गावातून हवाई दलात निवड झालेला पहिलाच तरुण ठरला आहे.

Advertisement

नक्की वाचा - DMart पेक्षाही स्वस्त? 'या' स्टोअर्समध्ये उडतीय ग्राहकांची झुंबड, परवडणाऱ्या फॅशनचा नवा ट्रेंड

लहान मुलगा अर्जुन याने हवाई दलात निवड झाली असली तरी त्याची महत्त्वाकांक्षा इथेच थांबलेली नाही. त्याने एनडीएची (NDA) लेखी परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. 20 जुलै रोजी त्याची एसएसबी (SSB) मुलाखत होणार आहे. यात यश मिळाल्यास तो थेट लष्कर अधिकारी बनू शकतो. दोन्ही भावांच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण अजमेर जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत असून इतर तरुणांसाठी हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.

नक्की वाचा - Ashadhi Wari: तुकोबारायांच्या पालखीला का घातलं जातं मेंढ्यांचं रिंगण? काय आहे त्या मागची परंपरा अन् मान्यता

वडिलांनी अत्यंत अभिमानाने सांगितले की, त्यांचा लहान मुलगा अर्जुन (वय 18) याची 1 जून रोजी हवाई दलात निवड झाली. तर 11 जून रोजी मोठा मुलगा धर्मराज (वय 23) याने तिसऱ्या श्रेणीच्या शिक्षक भरती परीक्षेत बाजी मारली. दोघांनीही पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. अर्जुन हा तर संपूर्ण गावातून हवाई दलात जाणारा पहिलाच मुलगा ठरला असून, गावकऱ्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. हवाई दलात एअरमन बनलेला अर्जुन आता अधिकारी बनण्याच्या तयारीत आहे.