जाहिरात

Ashadhi Wari: तुकोबारायांच्या पालखीला का घातलं जातं मेंढ्यांचं रिंगण? काय आहे त्या मागची परंपरा अन् मान्यता

याबाबत मेंढपाळ सोमनाथ माने यांनी ही काही माहित दिली आहे. त्यांनी सांगितलं की ही परंपरा आजची नाही.

Ashadhi Wari: तुकोबारायांच्या पालखीला का घातलं जातं मेंढ्यांचं रिंगण? काय आहे त्या मागची परंपरा अन् मान्यता
  • तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात काटेवाडी येथे मेंढ्यांचे पहिलं गोल रिंगण पार पडले
  • तुकाराम महाराजांच्या पालखीला मेंढ्या यावेळी तिन प्रदक्षिणा घालतात
  • गेल्या 300 वर्षापासून मेंढ्यांचे गोल रिंगणाची परंपरा काटेवाडीमध्ये चालू आहे
पुणे:

देवा राखुंडे 

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेन पुढे चालला आहे. हा पालखी सोबळा आता बारामती तालुक्यातील काटेवाडी पोहोचला आहे. या ठिकाणी  मेंढ्यांचे पहिलं गोल रिंगण पार पडल आहे. तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला या मेंढ्यांनी तीन प्रदक्षिणा मारल्यानंतर हे रिंगण पूर्ण झालं. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी काठेवाडीत मोठी गर्दी झाली होती. वारकऱ्यांनी आणि विठ्ठल भक्तांनी हा रिंगण सोहळा याची देही याची डोळा पाहीला. त्यानंतर  तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील सणसर या ठिकाणी मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. पण हे मेंढ्यांचे गोल रिंगण का घातलं जातं ते आज आपण पाहाणार आहे. त्यामागे काय इतिहास आहे तो जाणून घेणार आहोत. 

काटेवाडीमध्ये पहिलं मेंढ्यांचं गोल रिंगण घातलं जातं. या रिंगण सोहळ्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. अनेक वर्षांपूर्वी मेंढ्यांना रोग आला होता. त्यात अनेक मेंढ्यांचा मृत्यू झाला. त्याच फटका मेंढपाळांना बसत होता. डोळ्या समोर मेंढ्या मरत होत्या. ज्या वेळी हे सर्व होत होतं त्याच वेळी या मार्गातून तुकोबारायांचा पालखी सोहळा जात होता. त्यावेळी कुणीतरी सांगितलं की तुम्ही पांडूरंगाकडे साकडं घाला. तुकोबारायांच्या पालखी समोर साकडं घालं. त्यानंतर तिथल्या  मेंढपाळांनी विठूरायाकडे, तुकोबारायांकडे मागणं केलं. त्यांना साकडं घातलं. 

नक्की वाचा - Ashadhi Wari: वारीच्या वाटेवर टाळ अन् घुंगरूचा संगम! गेल्या 32 वर्षापासून लावणी अन् वारकऱ्याची अनोखी परंपरा

त्यात त्यांनी आमच्या मेंढ्या वाचू द्या. त्यांचा मृत्यू थांबवा. आमचं जिवन सुखी होवू द्या असं साकडं घातलं. आणि काय आश्चर्य मेंढ्यांचा मृत्यू थांबला असं सांगितलं जातं. त्या वेळे पासून बारामतीच्या काठेवाडी इथं संत तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर मेंढ्यांचे गोल रिंगण घातलं जातं. तुकाराम महाराजाच्या रथाला तिन प्रदक्षिणा मेंढ्या घालतात. ही परंपरा आज ही कायम राखली गेली आहे. याबाबत मेंढपाळ सोमनाथ माने यांनी ही काही माहित दिली आहे. त्यांनी सांगितलं की ही परंपरा आजची नाही. 

नक्की वाचा - Wari History: वारी म्हणजे काय? वारकरी नेमकं कोणाला म्हणतात? जाणून घ्या रंजक इतिहास

जवळपास 300 वर्षापासून  चालत आली आहे. आमचे पूर्वजांनी ही सुरू केली. ती आज आम्ही सुरू ठेवली आहे. पुढे आमची मुलं ही मेंढ्यांच्या गोल रिंगणांची परंपरा सुरू ठेवतील. ही परंपरा सुरू झाल्यापासून विठ्ठलाने आमचं भलं केलं आहे. आमच्या घरी सुख आणि समृद्धी नांदत आहे असं ही त्यांनी यावेळी सांगितं. जे साकडं घातलं गेलं त्यानंतर बकऱ्यांचा मृत्यूचे प्रमाण कमी झाले. शिवाय बकऱ्यांची संख्या ही वाढत गेली. विठ्ठलाने आमचं चांगलं केलं असं ही ते म्हणाले. दरम्यान या वारीत अजित पवारांची कमी भासते असं या मेंढपालांनी आवर्जून सांगितले. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com