Success Story: वडिलांचे स्वप्न साकार करणारी लेक! लग्नानंतर ही नाही मानली हार, पाच वेळा अपयश आलं पण शेवटी...

या सर्वात तिला तिच्या सासरच्या लोकांनी मोठा पाठिंबा दिला. तिचे पती तिच्या मागे खंबीर पणे उभे राहीले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Inspirational Story: कोणती ही गोष्ट अशक्य नसते. त्यासाठी इच्छाशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. तसे असल्यास कोणतीही अडचण ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकत नाही. हे 30 वर्षीय राशी चौबे हिने सिद्ध केले आहे. ती मध्य प्रदेशच्या सागरची आहे. वडिलांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राशीने सलग 5 वेळा अपयश आल्यानंतरही हार मानली नाही. अखेर 6 व्या प्रयत्नात तिने 'मध्य प्रदेश लोकसेवा आयोग' (MPPSC 2025) परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. या यशमुळे तिला खनिज निरीक्षक (Mining Inspector) पदावर नियुक्ती झाली आहे. 

​राशीचे वडील मंदिरात पुजारी होते.  त्यांच्याच उत्पन्नावर 5 भावंडांसह संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. राशीचे लग्न करण्याचं सुरू होतं. पण लग्न झालं  तरी वडीलांचे स्वप्न पुर्ण करायचे असे राशीने ठरवले होते. त्यामुळे लग्नाची चर्चा सुरू असतानाच तिने आपल्या स्पर्धा परिक्षेच्या तयारीत खंड पडू दिला नाही. विशेष म्हणजे अपयश आले तरी ती खचली नाही. तिने आपली तयारी सुरूच ठेवली. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच राशीच्या वडिलांचे निधन झाले. या धक्क्याने ती पूर्णपणे कोलमडली होती. वडिलांच्या निधनानंतर कौटुंबिक परिस्थितीमुळे भावाने राशीचे लग्न लावून दिले.

Advertisement

नक्की वाचा - NEET Result: ना कोटा, ना कोणतं मोठं शहर... बारामतीतच अभ्यास करणारी श्रावणी देशात पाचवी , वाचा Success Story

​लग्नानंतर राशी एकत्रीत कुटुंबात राहात होती. सासरच्या मंडळींनी तिला सुनेऐवजी मुलीसारखे सांभाळले. पती आणि सासू-साऱ्यांनी तिच्या अभ्यासाला पूर्ण पाठिंबा दिला. परीक्षा देण्यासाठी जाताना सासू स्वतः डबा तयार करून देत होती. दिवसा घरची जबाबदारी सांभाळून राशी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची. तिच्या या सातत्यपूर्ण परिश्रमांना अखेर यश आले असून, तिने संपूर्ण सागर जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. तीने अभ्यासात कधी ही खंड पडू दिला नाही. काही करून वडीलांचे स्वप्न पूर्ण करायचे अशी तिची भूमीका होती. त्यापासून ती कधीच मागे हटली नाही. 

नक्की वाचा - NEET Result: पेपर फुटीनंतर NEETचा निकाल वादात! उत्तरपत्रिकेत 522 गुण, पण स्कोअर कार्डवर फक्त...

या सर्वात तिला तिच्या सासरच्या लोकांनी मोठा पाठिंबा दिला. तिचे पती तिच्या मागे खंबीर पणे उभे राहीले. सासू- सासरे ही तिच्या अभ्यासाच्या आड आले नाहीत. त्यामुळे अभ्यासाला राशीला मोकळे रान मिळाले होते. तिने या संधीचे सोने केले. पहिले काही प्रयत्नात तिला अपयश आले ही वस्तूस्थिती आहे. पण त्याने ती काही खचली नाही. तिने प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी सहाव्या प्रयत्नात तिने  MPPSC 2025 ची परीक्षा उत्तीर्ण केली. तिची नियुक्ती आता मायनिंग इन्स्पेक्टर पदावर होणार आहे. मुलीने शिकून मोठे अधिकारी व्हावे, अशी तिच्या वडीलांची इच्छा होती. ती इच्छा तिने पूर्ण केली आहे.


Topics mentioned in this article