आकाश सावंत, बीड:
Beed NEET Exam Paper News: पेपर फुटी प्रकरणाने मोठा गदारोळ झाल्यानंतर नीटची पुनर्रपरीक्षा घेण्यात आली. शुक्रवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र पेपर फुटी प्रकरणानंतर आता 'नीट यूजी २०२६'चा निकाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बीडमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोअर कार्डवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केला आहे. बीडच्या सोहम गवते या विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेनुसार ५२२ गुण अपेक्षित असताना स्कोअर कार्डवर अवघे ९५ गुण आले आहेत. त्यामुळे सोहम या निकालावर आक्षेप घेतला आहे.
Nashik News: नाशिक हादरले! पीजीत राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात हत्या, आरोपी तरुणाचेही टोकाचे पाऊल
पेपरफुटीनंतर नीटच्या निकालातही घोळ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नीट परीक्षा निकालातही घोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडमधील सोहम गवते या विद्यार्थ्याने नीटची परीक्षा दिली होती. त्याला अन्सर की नुसार ५२२ मार्क मिळण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतर त्याला अवघे ९५ गुण मिळाले आहेत. या प्रकाराने सोहमसह त्याचे कुटुंबीय हादरुन केले आहे. सोहमने रात्रंदिवस अभ्यास केला. तो फक्त सकाळी नाश्ता करायला, दुपारी जेवायला वरच्या खोलीतून खाली येत होता. दिवस-दिवस तो परीक्षेची तयारी करत होता मात्र निकालामध्ये तफावत दिसून येत आहे, असं म्हणत सोहमच्या आई वडिलांना अश्रु अनावर झाले.
तो कधी नातेवाईकांकडे गेला नाही, ना कधी कोणत्या सणात सहभागी झाला. तो लातुरला शिकायला होता त्याला तिथल्या मेसचे जेवण बाधले, त्याचे मुळव्याधाचे ऑपरेशनही झाले. मात्र एवढी मेहनत करुनही त्याला निकालात फक्त ९५ मार्क मिळाले. निकालानंतर त्याने स्वतःला खोलीत बंद केले होते, असे सांगत नीट परीक्षा मधील गोंधळ आमच्या विद्यार्थ्यांचे भविष्य खराब करेल या भीतीने सोहमच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. तर सोहम धक्क्यामध्ये होता त्याला कसं सावरलं हे आम्हाला माहिती असं सोहमच्या आईने सांगितले.
(नक्की वाचा: Jalgaon Crime: महाराष्ट्र हादरला! नवऱ्याकडून ट्रॅक्टरचे भाडे थकले, 4 नराधमांनी बायकोची अब्रु लुटली)
दरम्यान, या तफावतीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी असून, निकालात दुरुस्ती न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून काय स्पष्टीकरण येते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.'नीट' निकालातील या निकालातील त्रुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असून, एनटीएने याची तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world