जाहिरात

Success Story: वडीलांनी नातं तोडलं, मित्रांनी थट्टा केली, सर्व विरोध झुगारून यश मिळवणाऱ्या सीमाची कहाणी

स्वतःचा खर्च आणि जिमची फी भरण्यासाठी सीमाने मेडिकल स्टोअर आणि ब्युटी पार्लरमध्ये काम केले.

Success Story: वडीलांनी नातं तोडलं, मित्रांनी थट्टा केली, सर्व विरोध झुगारून यश मिळवणाऱ्या सीमाची कहाणी
  • मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील सीमा रैकवारने जिद्द आणि चिकाटीने पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवले
  • वडिलांच्या विरोध असूनही सीमाने जिममध्ये प्रशिक्षण घेतले आणि आर्थिक अडचणींवर मात केली
  • मेडिकल स्टोअर आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करून तिने स्वतःचा खर्च भागवला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

ती लढली आणि जिंकली. एकीकडे विरोध होता. त्याला ती सामोरी गेली. वेळ पडताच मेडिकल स्टोअरमध्ये काम केलं. ब्युटीपार्लरमध्येही कामाला राहीली. पण जिद्द सोडली नाही. शेवटी तिच्या मेहनतीला फळ मिळाली. यश तिच्या पायाजवळ आले. त्यामुळे तिची चर्चा आज संपूर्ण राज्यात होत आहे. ती म्हणजे सीमा रैकवार. या 25 वर्षाच्या तरूणीने जे करून दाखवलं आहे त्याला तोड नाही. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एका छोट्या गावातून आलेल्या 25 वर्षीय सीमा रैकवारने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. सामाजिक बंधने, आर्थिक चणचण आणि कौटुंबिक विरोधाला न जुमानता सीमाने सीहोर येथे आयोजित पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक (Silver Medal) पटकावून सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. 

एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सीमाला पोलीस दलात भरती व्हायचे होते. अभ्यासासाठी ती शहरात आली. मात्र तिथे तिला पॉवरलिफ्टिंग या खेळाची ओढ लागली. मुलीने जिममध्ये जाणे समाजाला मान्य होणार नाही. या भीतीने वडिलांनी तिला कडाडून विरोध केला. तुला हे करता येणार नाही अशा शब्दात तिला सांगितलं गेलं. इतकेच नाही तर वडिलांनी तिच्याशी तब्बल 2 वर्षे संवाद साधला नाही. जवळपास नातं तोडलं. हे कमी की काय म्हणून घरून मिळणारी आर्थिक मदतही बंद केली. मात्र, सीमाने हार मानली नाही. ती या परिस्थितीशी लढली आणि जिंकली. 

नक्की वाचा - Inspiring Story: कायद्याचे शिक्षण नाही, तरीही सर्वोच्च न्यायालयात जिंकली लढाई!, अथर्वच्या संघर्षाची कहाणी

स्वतःचा खर्च आणि जिमची फी भरण्यासाठी सीमाने मेडिकल स्टोअर आणि ब्युटी पार्लरमध्ये काम केले. प्रशिक्षणासाठी ती दररोज ट्रेनने 70 KM प्रवास करायची. अनेकदा तिकीटाचे पैसे नसायचे, पण खेळाप्रती असलेली निष्ठा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. आज तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, प्रतिकूल परिस्थितीत स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी ती एक आदर्श ठरली आहे. वडिलांनी घरातून मदत बंद केल्यानंतर सीमाने ब्युटी पार्लरमध्ये काम करून आपली स्वप्ने जिवंत ठेवली.  टीका करणाऱ्यांची तोंडे आपल्या यशाने कशी बंद करायची, हे सागरच्या सीमा रैकवारने दाखवून दिले आहे. "मुलींनी घराच्या उंबरठ्यात राहावे" अशा विचारांच्या गावातून आलेल्या सीमाने जेव्हा पॉवरलिफ्टिंग निवडले, तेव्हा समाजासह मित्र-मैत्रिणींनीही तिची थट्टा उडवली. "तू मुलांसारखी दिसतेस, मुलांसारखी चालतेस" असे टोमणे तिला रोज ऐकावे लागत होते.

नक्की वाचा - Success Story: 12 वी नापास, सायकलवर दूधविक्री!, जिद्दीच्या जोरावर नाशिकच्या लेकाने दिल्ली गाजवली

पहाटे 6 वाजता घरून निघून रात्री उशिरापर्यंत तिचा सराव आणि काम सुरू असायचे. अनेक वेळा अपयश आल्याने ती खचली होती. पण तिच्या गुरूंनी दिलेला विश्वास तिने सार्थ ठरला. सीहोरमधील स्पर्धेत तिने शिवपुरीच्या खेळाडूला कडवी झुंज देत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. सीमाने मिळवलेले हे पदक केवळ एका खेळाडूचे विजयचिन्ह नसून, त्या बापासाठी दिलेले उत्तर आहे ज्यांनी तिच्याशी बोलणे सोडले होते. "ही तर फक्त सुरुवात आहे, आता देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे," असा निर्धार सीमाने व्यक्त केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com