जाहिरात

Success story: एका रात्रीत 77 कोटी कमवाले! 'त्या' तरुणाला हे कसे जमले? थक्क करणारी कहाणी

त्याने स्वत: चा स्टार्टअप करण्या आधी भारत आणि परदेशातील अनेक मोठ्या कंपन्यामध्ये काम केले आहे.

Success story: एका रात्रीत 77 कोटी कमवाले! 'त्या' तरुणाला हे कसे जमले? थक्क करणारी कहाणी
  • २६ वर्षांचे सिद्धार्थ सक्सेना यांनी एका दिवसात तब्बल ७७ कोटी रुपये कमावले
  • सिद्धार्थ आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी असून त्यांनी मर्लिन नावाचा एआय स्टार्टअप सुरू केला आहे
  • मर्लिन हा एआय-आधारित क्रोम एक्स्टेंशन असून वापरकर्त्यांच्या उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो

कोणाचं नशिब कधी पालटेल हे सांगता येत नाही. जिद्द आणि प्रामाणिक पणा असेल तर ते ही शक्य आहे. असंच एका 26 वर्षाच्या तरुणाचे नशिब एका रात्रीत पालटलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या तरुणाने एका रात्रीत एक दोन नाही तर तब्बल 77 कोटी रूपये कमावले आहेत. हा भीम पराक्रम त्याने खरोखर करून दाखवला आहे. या तरुणाचं नाव सिद्धार्थ सक्सेना असं आहे. याची माहिती स्वत: सिद्धार्थने दिली आहे. अनेकांनी यावर विश्वास बसला नाही. पण त्याने हे कसे शक्य झाले हे सांगताना सर्वांनाच आवाक केले आहे. 

सिद्धार्थ सक्सेना हा आयआयटी कानपूरचा माजी विद्यार्थी आहे. शिवाय तो 'मर्लिन' या एआय स्टार्टअपचा संस्थापक ही आहे. तो फक्त 26 वर्षांचा आहे. त्याचं वय जरी लहान असलं तरी त्याची कामगिरी मात्र दमदार आहे. सिद्धार्थने फक्त एका दिवसात तब्बल 80 लाख डॉलर्स कमवले. भारतीय रुपयांचा विचार केल्यास ही रक्कम जवळपास 77 कोटी रुपये होते. त्यांने ही माहिती एका मुलाखतीत दिली. यामध्ये त्याने त्याच्या इंजिनिअरिंगच्या अभ्यासापासून अगदी एआय स्टार्टअप्सचा प्रवास सांगितला आहे.

नक्की वाचा - Pandharpur news: दारूचा हवा तो ब्रँड, हवा तो फ्लेवर! पालखी मार्गावर मोठा दारू साठा, किंमत ऐकून हैराण व्हाल

सिद्धार्थने आपल्या एका दिवसाच्या कामाईचा उलगडा विराज आला याच्या स्ट्रीट स्टाईल मुलाखतीत केला आहे.  विराज आला हा एक फेमस कंटेंट क्रिएटर आहे. यावेळी त्याला त्याच्या आर्थिक स्थिती बाबत विचारण्यात आले. त्यावर त्याने  मी एकाच दिवसात 80 लाख डॉलर्स कमावले आहेत असं त्याने सांगितले. या कमाईने तू एका रात्रीत करोडपती झालास का? असं त्याला विचारण्यात आलं. त्यावर त्याचं उत्तर हो असंच होतं. त्याची ही मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. 

नक्की वाचा - Success Story: वडिलांचे स्वप्न साकार करणारी लेक! लग्नानंतर ही नाही मानली हार, पाच वेळा अपयश आलं पण शेवटी...

सिद्धार्थ यआयटी कानपूरचा विद्यार्थी आहे. तिथूनच त्याने 'कंप्युटर सायन्स' केले आहे. त्याने स्वत: चा स्टार्टअप करण्या आधी भारत आणि परदेशातील अनेक मोठ्या कंपन्यामध्ये काम केले आहे. त्यात त्याने अधिक काम मशीन लर्निंग आणि एआय तंत्रज्ञानावर केले. त्याचा त्याला मोठा फायदा ही झाला.  यात फिनलंडमधील आल्टो युनिव्हर्सिटी, एन्व्हेस्टनेट आणि वाधवानी एआय यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. 2022 मध्ये सिद्धार्थने आपल्या मित्रांसोबत'मर्लिन' या एआय स्टार्टपची सुरूवात केली. हे एक एआय-आधारित 'क्रोम एक्स्टेंशन' आहे. ते युजर्सची उत्पादकता वाढवण्याचे काम करते. सध्या या कंपनीची उलाढाल 50 मिलियन डॉलर्स आहे. भारतीय रुपयांत ती 400 कोटींहून अधिक आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com