Bhushan Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश, घेतली पदाची शपथ

अमरावतीचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आज 14 मे रोजी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chief Justice of India Bhushan Gavai : अमरावतीचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आज 14 मे रोजी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. भूषण गवई हे भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर नवे सरन्यायाधीश कोण असतील याबाबत बरीच उत्सुकता होती. अखेर भूषण गवई यांचं नाव निश्चित करण्यात आलं.  त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असणार असून तो 23 नोव्हेंबर 2025 रोजी संपेल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भूषण गवई यांनी त्यांनी जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित केला. सर्वसामान्यांसाठीही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण आदेश पारित केले. यासोबतच उत्तर प्रदेशातील आरोपींच्या घरांवर बुलढोझर चालविण्याच्या कारवाईवरुन त्यांनी सरकारला फटकारलं होतं. 

बुलढोझर कारवाईवरुन सरकारला फटकारलं...

न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेक गोष्टी सुरू केल्या. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारला बुलढोझर कारवाईवरुन फटकारलं.  सर्वोच्च न्यायालयात वकील न्यायमूर्तींसमोर मोठ्या आवाजात बोलत होते. त्यांनी यावर आक्षेप नोंदवला आणि वकिलांना कडक शब्दात फटकारलं. ते नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत, जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश झाले होते. 

Advertisement

नक्की वाचा - Justice BR Gavai : देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, भावी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आईंची मोठी मागणी

भूषण गवई यांचे महत्त्वाचे निर्णय..

- आरोपींविरोधात सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईविरुद्ध भूषण गवई यांनी कठोर भूमिका घेतली. न्यायिक प्रक्रिया न पाळता चालवलेली कारवाई ही नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना आणि कायद्याच्या अधिपत्याला विरोधी आहे,” असे स्पष्ट केले.
- कलम 370 रद्दबातल ठरवणाऱ्या निर्णयास मान्यता
- नोटाबंदीला दिलेली घटनात्मक वैधता
- अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गवारीस मान्यता
- तेलंगणाच्या ‘लिकर पॉलिसी' प्रकरणात के. कविता यांना दिली जामिन
- तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दोन वेळा फटकारले 

अमरावती आणि नागपुरसोबत खास कनेक्शन...

न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 नोव्हेंबर 1960 मध्ये झाला. मुंबईत विधीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये वकिलीची सुरुवात केली. करिअरच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केलं. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजा ए. भोसले यांच्यासोबत काम केलं. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीशही बनले. काही काळानंतर त्यांची पदोन्नती झाली. ते 24 मे 2019 ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. आता 14 मे 2025 रोजी ते सरन्यायाशीधपदाची शपथ घेतली. ते सहा महिन्यांसाठी या पदावर असतील, त्यानंतर 23 नोव्हेंबर 2025 ला निवृत्त होतील.