सर्वोच्च न्यायालयाचा भटक्या कुत्र्यांबाबत मोठा निर्णय
Stray Dogs Supreme Court: भटक्या कुत्र्यांबाबत अखेर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वजण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीक्षेत होते. भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये टाकण्याच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, तातडीने भटक्या कुत्र्यांची सुटका करा आणि यांच्या खाण्याची सोय करावी. मात्र आता सोसायटी किंवा घराबाहेर भटक्या कुत्र्याला खाऊ घालू शकत नाही.
कुत्र्यांना खाद्यपदार्थ देण्याबाबत काय आहे नियम?
- सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला देता येणार नाही.
- कुत्र्यांना कोणत्याही सोसायटी किंवा बाजारात खायला देता येणार नाही.
- भटक्या कुत्र्यांना खायला देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी फिडिंग स्पेस उघडल्या जातील.
- कुत्र्यांसाठी तयार केलेल्या जागेतच त्यांना खायला देऊ शकतात.
- सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- कुत्र्यांना कुठेही खायला दिल्याने समस्या निर्माण होते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.