सर्वोच्च न्यायालयाने नीट यूजी 2024 परीक्षेत कथित पेपर लीक प्रकरणात एनटीएला (National Testing Agency) तिखट शब्दात सूचना दिल्या आहेत. परीक्षेच्या आयोजनात काही चूक झाली असेल तर त्याचा स्वीकार करायला हवा. त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायाधीश विक्रम नाथ आणि जस्टिस एसवीएन भट्टी यांच्या खंडपीठाने सांगितलं की, यात काही गोंधळ झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि एनटीए फटकारलं. ते म्हणाले, लाखो विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केली आहे, त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
दुसऱ्या याचिकेवर 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला 8 जुलैपर्यंत तयार राहण्यास सांगितलं आहे. नव्या याचिकांवर केंद्र आणि एनटीएला नोटीस देण्यात आली आहे आणि आठवड्यात उत्तर मागितलं आहे.
कोणाकडूनही 0.001 टक्के निष्काळजीपणा झाला तरी सोडवा...
NEET प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात एनटीएला फटकारलं. ते म्हणाले, कोणाकडूनही 0.001 टक्के निष्काळजीपणा झाला तरी त्यावर कारवाई व्हायला हवी. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली आहे. आम्ही त्यांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
नक्की वाचा - IAS Officers Transfer : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा संपूर्ण यादी
8 जुलैला महत्त्वपूर्ण सुनावणी...
नीट-यूजी 2024 मध्ये गोंधळ झाल्याच्या आरोपांची सीबीआयकडून तपास करण्यात यावी या याचिकेवर 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त नीट यूजी परीक्षेत झालेल्या कथित अनियमिततांची सीबीआयने तपास करावा अशी याचिका यापूर्वी दाखल करण्यात आली होती. यावर केंद्र, एनटीए आणि अन्य जणांना नोटीस जारी करीत दोन आठवड्यात उत्तर देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाकडून करण्यात आल्या आहेत.