Air India Flight : प्रवासी विमानातचं 'झिंगाट'; 4 तासांच्या प्रवासात अख्खी दारु रिचवली, स्टॉकच संपला

जाहिरात
Read Time: 2 mins

गुजरातमधूनसुरत ते थायलंडची राजधानी बँकॉक या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या पहिल्या चार तासांच्या उड्डाणात विमानात दारूची चांगलीच विक्री झाली होती. प्रवाशांनी दोन लाख रुपयांची दारू प्राशन केल्याची माहिती समोर येता आहे. दारुच्या विक्रमीनंतर काही प्रवाशांनी दारूचा साठा संपल्याचा दावा केला. विमानात 175 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. विमानाची प्रवासी क्षमता 176 आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गुजरातहून आलेल्या या विमानातील प्रवाशांनी काही तासांतच दारूचा संपूर्ण साठा संपवला,असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. दारुची जादा विक्री झाल्याचा दावा एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी केला . मात्र दारुसाठा संपलेला नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, 737-8 विमानाने चालवलेल्या फ्लाइटमध्ये 175 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. या विमानाची प्रवासी क्षमता 176 आहे. एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा फेटाळून लावल्या. अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, सूरत ते बँकॉक या फ्लाइटमध्ये मद्याची जादा विक्री झाली होती, परंतु सोशल मीडियावर काही लोकांनी दावा केल्याप्रमाणे हा साठा संपला नाही. 

(नक्की वाचा- Pune Accident: पुण्यात हिट अँड रन! भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं, 3 जण ठार)

विमानात अल्कोहोल आणि अन्नाचा पुरेसा साठा होता, असेही त्यांनी सांगितले. तथापि, टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्सप्रेसकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. मात्र फ्लाइटमधील सुमारे 175 प्रवाशांनी  4 तासांच्या प्रवासात 1.80 लाख रुपयांची 15 लिटर दारू प्यायली.

Advertisement

अधिकाऱ्यांच्या मते, सामान्यपणे कोणत्याही प्रवाशाला फ्लाइट दरम्यान 100 मिली पेक्षा जास्त अल्कोहोल दिले जात नाही. त्याच वेळी, कोणतीही विमान कंपनी विमानातील प्रवाशांना पाच प्रकारची दारू पुरवते. यामध्ये 50 मिलीसाठी 600 रुपये किंमत असलेल्या चिवास रिगलचा समावेश आहे. तर रेड लेबल, बाकार्डी व्हाइट रम आणि बीफिटर जिन 50 मिलीसाठी प्रत्येकी 400 रुपये आहे. 

नक्की वाचा - Guardian Minister : खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय शिरसाटांनी आधीच केलं जाहीर

तसेच जर आपण विमान प्रवासादरम्यानचे खाद्यपदार्थ तिकीट बुक करताना प्री-बुक केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, प्रवासी फ्लाइट दरम्यान अन्न देखील खरेदी करू शकतात. 

Advertisement

Topics mentioned in this article