VIDEO: 140चं स्पीड, KTMचा भयंकर अपघात! युट्यूबरचं शीर धडावेगळं झालं; हादरवणारे CCTV फुटेज

Surat Youtuber Prince Patel Accident Viral Video: प्रिन्सने हेल्मेट घातले नव्हते, ज्यामुळे त्याचा जागीच जीव गेला.  खटोदरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Surat Youtuber Prince Patel Accident CCTV: ''आवरा वेगाला, सावरा जिवाला'' असं म्हणतात मात्र वाहन चालवताना अनेकदा वेगाचे भान राहत नाही अन् भयंकर घटना घडते. गुजरातमध्ये अशीच एक काळीज पिळवटणारी अन् थरकाप उडवणारी घटना घडली आहे. गुजरातच्या सूरत शहरात एका 19 वर्षीय युट्यूबरचा बाईक अपघातात मृत्यू झाला. ही घटना इतकी भयंकर होती की त्याचे शिर धडावेगळे झाले अन् उडून पडले. या भयावह अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. 

सुसाट वेगाने घेतला जीव..

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रिन्स पटेल हा उधन मगदल्ला रोडवरील युनिव्हर्सिटीकडून ग्रेट लाइनर ब्रिजवरून खाली उतरत असताना हा अपघात झाला. अति वेगामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची 'लॅला' नावाची बाईक थेट डिवाइडरला धडकली. प्रिन्सने हेल्मेट घातले नव्हते, ज्यामुळे त्याचा जागीच जीव गेला.  खटोदरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

Viral Video : पेट्रोल पंपावर तुमचीही फसवणूक होतेय? काय आहे '0' नंबर मीटर स्कॅम? ग्राहकाने केला पर्दाफाश

​प्रिन्स पटेल हा PKR Blogger या नावाने यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध होता. सोशल मीडियावर त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत. तो आपल्या केटीएम ड्यूक  बाईकवर वेगाने रिल्स बनवून ती सोशल मीडियावर अपलोड करत असे. त्याला सुसाट वेगात बाईक पळवण्याचे आणि साहसी व्हिडिओ बनवण्याचे वेड होते. त्याने दोन महिन्यांपूर्वीच केटीएम खरेदी केली होती, ज्याचे नाव त्याने 'लैला' ठेवले होते. 

स्वर्गातही माझी लैला...

​विशेष म्हणजे, या अपघाताच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी प्रिन्सने एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने स्वतःला 'मजनू' आणि बाईकला 'लैला' असे म्हटले होते. स्वर्गातही याच लैलावर मी प्रेम करेन. स्वर्गातल्या अप्सरांपेक्षा हीच लैला सुंदर आहे अन् तीच आवडते, असंही त्याने म्हटले होते. नियतीचा क्रुर खेळ बघा, या व्हिडिओनंतर चारच दिवसात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

Advertisement

दरम्यान, ​प्रिन्स पटेल आपल्या आईचा एकुलता एक आधार होता. त्याची आई अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दुध विकून घर चालवते. मुलाच्या कमाईमुळे घराला हातभार लागत होता. मात्र, क्षणात आलेल्या या अपघातामुळे त्या दूध विकणाऱ्या आईचा आधार हरपला आहे. एका क्षुल्लक चुकीमुळे आणि अति वेगाच्या हौसेमुळे एका कुटुंबावर आयुष्यभराचे दुःख ओढवले आहे.​सूरत पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे.

नक्की वाचा >> ग्राहकांची मज्जाच मज्जा! आता Maruti Fronx वर मिळणार वर्षभरातील सर्वात मोठं डिस्काऊंट, किंमत वाचून खुश व्हाल