Sushila Meena Video: सुशीला मीणा हिचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सुशीलाची बॉलिंग अॅक्शन जशीच्या तशी भारताचा जलदगती गोलंदाज जहीर खान याच्या सारखी आहे. 12 वर्षाच्या सुशीलाची बॉलिंग ऐक्शनने भलाभल्यांना भूरळ घातली आहे. त्याला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही अपवाद नाही. सचिन तेंडुलकरने या सुशीलाचा बॉलिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत तिचे कौतूक केले आहे. मीणा जहीर खान सारखी बॉलिंग करते असं सचिननं म्हटलं आहे. हा व्हिडीओ जहीर खान यानेही पाहिला. त्यानेही मीणाचं कौतूक केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मीणाच्या वडिलांचे नाव रतनलाल मीणा आहे. ते अहमदाबादमध्ये मजूरी करतात. त्यातूनच ते आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतात. सुशीलाला दोन भाऊ आहेत. एक तिच्या पेक्षा मोठा आहे. तर दुसरा तिच्या पेक्षा लहान आहे. मीणा सध्या पाचव्या वर्गात शिकते. मीणाला क्रिकेटचे धडे हे ईश्वरलाल मीणा हे देत आहेत. आतापर्यंत ती जे काही शिकले आहे ते ईश्वरलाल मीणा यांनी शिकवले आहे. ईश्वरलाल मीणा हे शालेय विद्यार्थ्यांना क्रिकेटचे धडे देत असतात. त्यातूनच ते सुशीलाला शिकवत आहेत.
सुशीला मीणा प्रमाणेच तिच्या गावातील आणि शाळेतील रेणूका पारगी या विद्यार्थीनीचाही बॅटींग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजप नेता कन्हैया लाल मीणा यांनी हा व्हिडीओ पाहिला. त्यानंतर रेणूकाला जयपूर इथल्या नैना क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश घेवून दिला होता. त्या प्रमाणे सुशीलाच्या कला गुणांना कोण वाव देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तीला जर संधी मिळाली तर ती खूप पुढे जावू शकते असंही सांगितलं जात आहे.
सचिन तेंडुलकरने सुशीलाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर बऱ्याच लोकांनी सुशीला बरोबर संपर्क केला. शिवाय तिच्या बरोबर व्हिडीओ कॉल द्वारे संभाषण ही केले. शिवाय भाजप नेता कन्हैया लाला मीणा हे तिला भेटण्यासाठी तिच्या शाळेत ही गेले होते. त्यांनी तिला नवीन क्रिकेट किट ही दिले आहे. शिवाय काही पैसेही मदत म्हणून दिले आहेत. त्याच बरोबर त्यांनी मंत्री किरोडी लाल मीणा आणि खासदार मन्नालाल रावत यांच्या बरोबरही व्हिडीओ कॉल द्वारे बोलणं करून दिलं आहे. भारत आदिवासी पक्षाचे पदाधिकारीही तिला भेटण्यासाठी येत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - Worlds shortest buffalo: जगातली सर्वात बुटकी म्हैस, वैशिष्ट्य पाहून अवाक व्हाल
सुशीला ज्या शाळेत शिकते त्या शाळेची स्थिती अतिशय वाईट आहे. शाळेला चांगले मैदानही नाही. ज्या मैदानात विद्यार्थी खेळू शकतील. अशा वेळी कोणी तरी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.सरकार त्याकडे लक्ष देणार का अशी विचारणाही आता होत आहे. शिवाय सुशीलाला कोणी संधी देणार का? छोट्या गावात असलेली सुशीला आपली स्वप्न पुर्ण करणार का? त्यासाठी तिला कोण मदत करणार की केवळ शुभेच्छा आणि व्हिडीओ कॉल पर्यंतच तिचे कौतूक मर्यादीत राहणार हा खरा प्रश्न आहे.