नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी सलग तीन वेळा पंतप्रधान बनले आहेत. या शपथविधी सोहळ्याला विविध देशांचे प्रमुख देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावर येताच सर्व मान्यवरांसह उपस्थित सर्वांना वाकून नमस्कार केला.
(वाचा- Modi 3.O : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातून अनेक दिग्गजांचा पत्ता कट)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कपड्यांची नेहमीच चर्चा होते. पंतप्रधान शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदी यांनी सफेद कुर्ता-पायजमा आणि निळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं.
नरेंद्र मोदी यांनी 2014, 2019 आणि 2024 असं सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतात राष्ट्रपती भवन परिसरात 'मोदी, मोदी..' जयघोष पाहायला मिळाला.
(नक्की वाचा- Modi 3.0 : माजी IPS अधिकारी, तामिळनाडू भाजपचा प्रदेशाध्यक्ष; राज्याचा 'सिंघम' घेणार मंत्रिपदाची शपथ )
शपथविधी सोहळ्यातील प्रमुख पाहुणे
शपथविधी सोहळ्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, भुटानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल, मॉरिशियसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अमहद अफीफ यांनी उपस्थिती लावली.