जाहिरात
This Article is From Dec 15, 2024

Zakir Hussain Passes Away: जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचे निधन

Zakir Hussain Passes Away: जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचे निधन

Zakir Hussain Passes Away: तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. PTIने दिलेल्या वृत्तानुसार, झाकीर हुसैन यांचे सॅन फ्रान्सिस्कोमधील हॉस्पिटलमध्ये निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी (16 डिसेंबर) सांगितले. मागील दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. यादरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून हृदयाशी संबंधित आजारांनी ते त्रस्त होते आणि त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. भारतीय शास्त्रीय संगीत आणि जागतिक फ्युजन संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांची जागतिक स्तरावर ख्याती होती. त्यांचे निधन संगीत क्षेत्रासाठी मोठी हानी आहे, आणि त्यांच्या कार्याची आठवण कायम स्मरणात राहील.

Zakir Hussain, 73, has died in San Francisco hospital, his family confirms.

READ: https://t.co/5NZ5BWnSQN

(File Photo) #ZakirHussain pic.twitter.com/kpw5D0wHg9

— Press Trust of India (@PTI_News) December 16, 2024

उस्ताद झाकीर हुसैन हे भारतीय तबला वादक आणि संगीतकार म्हणून जगभर प्रसिद्ध होते. ते उस्ताद अल्लारखा यांचे पुत्र होते. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक स्तरावर नेण्याचे महत्त्वाचे काम केले होते. त्यांनी लहान वयातच संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी आपले पहिलं व्यावसायिक सादरीकरण केले होते. त्यांनी पं. रविशंकर, अल्ला रक्खा, हरिप्रसाद चौरसिया यांसारख्या दिग्गजांसोबत काम केलं होतं.

त्यांनी फ्युजन म्युझिकमध्येही मोठे योगदान दिले होते. Shakti (जॉन मॅकलॉफलिनसोबत) आणि Planet Drum सारख्या प्रकल्पांमध्ये ते सहभागी झाले होते. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. त्या पद्मश्री (1988) आणि पद्मभूषण (2002) साली भारत सरकारकडून देण्यात आला होता. शिवाय ग्रॅमी पुरस्कार 1992 ला मिळाला होता. शिवाय राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटांसाठी संगीत दिल्याबद्दल देण्यात आला होता. कालिदास सन्मान आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार ही त्यांना मिळाला होता.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या पलीकडे जाऊन त्यांनी विविध संगीत प्रकारांना जोडले होते. जगभरात तबल्याच्या कलात्मकतेला मान्यता मिळवून देण्याचे बहुमोल काम त्यांनी केले. त्यांच्या स्मृतींना संगीतप्रेमी कायम लक्षात ठेवतील यात वाद नाही. त्यांनी संगीत श्रेत्रासाठी मोठं योगदान दिलं आहे. ते कधीही विसरता येणारं नाही त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. नव्या पिढीला त्यांच्या सारखा गुरू मिळणार नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विश्वविख्यात तबला नवाज पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांचे अमेरिकेत निधन झाल्याचे वृत्त भारतीय संगीत विश्वाकरिता अत्यंत धक्कादायक आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी यांनीही झाकीर हुसैन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

"झाकीर हुुसैन यांचा वारसा हा शाश्वत तालासारखा आहे, जो येणाऱ्या पिढ्यांमध्ये कायम प्रतिध्वनीत होत राहील."- गौतम अदाणी ,चेअरमन, अदाणी समूह#ZakirHussainPassdAway #GautamAdani #ndtvmarathi pic.twitter.com/VFgKV53tvP

— NDTV Marathi (@NDTVMarathi) December 16, 2024

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com