Tahawwur Rana : तहव्वुर राणाला भारताकडे सोपवतानाचे फोटो आले समोर, अमेरिकेने केले जारी

Tahawwur Rana Photos : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेशी संबंधित गुन्हेगारी आरोपांवर खटला चालवण्यासाठी अमेरिकेने तहव्वुरला भारताकडे प्रत्यार्पण केले आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
Tahawwur Rana : तहव्वुर राणाला भारताकडे सोपवतानाचे फोटो आले समोर, अमेरिकेने केले जारी

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला एनआयएने अमेरिकेतून भारतात फरपटत आणले आहे. अमेरिकेने त्याला भारतात प्रत्यार्पण केले. तहव्वुर राणांला भारताकडे सोपवतानेचे काही फोटो अमेरिकेने प्रसिद्ध केले आहेत. ज्यात अमेरिकन अधिकारी तहव्वुरला एनआयएकडे सोपवताना दिसत आहेत. ज्यामध्ये दहशतवादी राणा अमेरिकन मार्शल आणि एनआयए अधिकाऱ्यांनी वेढलेला दिसतोय. अमेरिकेच्या न्याय विभागाने हे फोटो प्रसिद्ध केले आहेत.

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेशी संबंधित गुन्हेगारी आरोपांवर खटला चालवण्यासाठी अमेरिकेने तहव्वुरला भारताकडे प्रत्यार्पण केले आहे. हल्ल्यात मारले गेलेले सहा अमेरिकन आणि इतर अनेक बळींना न्याय मिळवून देण्यासाठी त्याचे प्रत्यार्पण हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. तहव्वुर राणावर भारताविरोधात कट रचणे, खून करणे, दहशतवादी कृत्ये करणे यासह अनेक आरोप आहेत.

तहव्वुरला एनआयएकडे सोपवल्याचा पहिला फोटो

तहव्वुरवरील हे आरोप पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेशी संबंधित आहेत. 26 ते 29 नोव्हेंबर 2008 दरम्यान, 10 दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत घुसखोरी केली आणि अनेक ठिकाणी निष्पाप नागरिकांचा जीव घेतला. 

याप्रकरणी एनआयएने आज सकाळी 10 वाजेपासून तहव्वुर राणाची चौकशी सुरू केली आहे. मागील 16 वर्षांपासून अनुत्तरीत असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडण्याची शक्यता आहे. 

Advertisement