जाहिरात

Tamil Nadu CM oath ceremony: तमिळनाडूत 'विजय'राज! थलपतीने घेतली CM पदाची शपथ; आई- वडिलांच्या डोळ्यात अश्रु

गेल्या सहा दशकांपासून द्रमुक आणि अद्रमुक या दोनच पक्षांभोवती फिरणारे राजकारण विजय यांनी मोडीत काढले असून, आज ते राज्याचे ९ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतील.

Tamil Nadu CM oath ceremony: तमिळनाडूत 'विजय'राज! थलपतीने घेतली CM पदाची शपथ; आई- वडिलांच्या डोळ्यात अश्रु

Tamil Nadu Vijay Oath Ceremony: तमिळनाडूच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाला सुरुवात होत आहे. 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाचे संस्थापक आणि अभिनेते सी. जोसेफ विजय म्हणजेच थलपती विजयने आज सकाळी १० वाजता चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या सहा दशकांपासून द्रमुक आणि अद्रमुक या दोनच पक्षांभोवती फिरणारे राजकारण विजय यांनी मोडीत काढले असून, आज ते राज्याचे ९ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतील.

Thalapathy Vijay: 'मॅजिक नंबर' मिळाला! तामिळनाडूत 'विजय सरकार'चा मार्ग मोकळा, वाचा कसं असेल समीकरण?

तमिळनाडूत 'विजय'राज! 

सुपरस्टार ते मुख्यमंत्री असा प्रवास करत आज तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेते सी जोसेफ विजय यांची दमदार एन्ट्री झाली आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी पक्षाची स्थापना करुन झंझावती प्रचार करत विजय यांनी विधानसभा निवडणुकीत डोळे दिपवणारे यश मिळवले. या मोठ्या विजयासोबतच विजय हे आज मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होत असून आजपासून तमिळनाडूमध्ये विजयराज सुरु होत आहे. 

​विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकून टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला ११७ चा आकडा गाठण्यासाठी त्यांना काँग्रेस (५), भाकपा (२), माकपा (२), व्हीसीके (२) आणि आययुएमएल (२) या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. अशाप्रकारे १२० आमदारांच्या बळावर विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांची नियुक्ती केली असून १३ मे पर्यंत त्यांना विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत करावा लागणार आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी दिल्लीहून काँग्रेस नेते राहुल गांधी चेन्नईत दाखल झाले आहेत. विजय यांच्यासोबत आज तामिळनाडूचे ८ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये व्यंकटरमण, राज मोहन, अरुण राज, आनंद, अद्वा अर्जुन, सेंगोट्टय्यान, निर्मल कुमार आणि प्रभू यांचा समावेश आहे. पारदर्शक प्रशासन आणि सामाजिक न्यायाचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या या 'सुपरस्टार' मुख्यमंत्र्याकडून तामिळनाडूच्या जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.

Tamil Nadu Election: तृषा कृष्णनचीही राजकारणात एन्ट्री? विजयच्या जागेवर निवडणूक लढण्याची चर्चा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com