Tamil Nadu Politics : तामिळनाडूच्या राजकारणात सिनेसृष्टीतील कलाकारांचं वर्चस्व का असतं? मोठी आहे यादी

दक्षिण भारतातील अभिनेत्यांना राजकारणात आल्यानंतर जितकी प्रसिद्ध मिळते तितकं यश बॉलिवूडच्या कलाकारांनाही मिळत नाही, हे गेल्या काही वर्षांच्या देशाच्या राजकारणावरुन स्पष्ट होतं.

जाहिरात
Read Time: 3 mins

Tamil Nadu Politics : दक्षिण भारतातील अभिनेत्यांना राजकारणात आल्यानंतर जितकी प्रसिद्ध मिळते तितकं यश बॉलिवूडच्या कलाकारांनाही मिळत नाही, हे गेल्या काही वर्षांच्या देशाच्या राजकारणावरुन स्पष्ट होतं. विजय थलपती यांनी नुकतीच मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. यानंतर दक्षिणेतील सुपरस्टार आणि राजकारण हा विषय चर्चेत आहे.

फिल्मी नायक ते राजकारणातील प्रभावी नेतृत्व...

तामिळनाडूच्या राजकारणात एक असा पॅटर्न पाहायला मिळतो, ज्यामध्ये चित्रपटांना अत्यंत महत्त्व दिलं जातं. या राज्याच्या राजकारणात सेलिब्रिटींना थेट एकगठ्ठा मतं मिळतात. येथील फिल्मी नायक रियल जगात अत्यंत प्रभावी चेहरा बनून समोर येतात. मग कमल हसन असो वा रजनीकांत, अगदी विधानसभा २०२६ मध्ये विजयी ठरलेले थलपती असो. तामिळनाडूमध्ये एमजीआर आणि जयललितासारख्या कलाकारांनी आपल्या प्रतिमेचा वापर करून सत्ता बदलली. त्यामुळे या राज्यातील अधिकांश मुख्यमंत्र्याची फिल्मी पार्श्वभूमी असल्याचं दिसतं. 

Advertisement

तामिळनाडूच्या राजकारणात चित्रपटाचा थेट परिणाम १९५०-६० च्या दशकापासून पाहायला मिळतो. सी. एन. अण्णादुराई यांच्यासारख्या द्रविड चळवळीच्या नेत्यांनी केवळ जनतेचं मनोरंजनच केलं नाही, तर वैचारिक प्रचारक म्हणूनही काम केलं. त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, ब्राम्हणवाद विरोधी आणि प्रादेशिक ओळख यांसारखे मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवले. त्या काळात चित्रपटातून राजकारणासाठी जमीन तयार करण्यात आली आणि प्रेक्षक हळूहळू मतदारांमध्ये परिवर्तित होत गेला. यादरम्यान, तामिळनाडूमध्ये राजकारणाची भाषा आणि शैली कायमस्वरुपी बदलली. 

तमिळ चित्रपटांच्या गीतांनी हृदयाला केला स्पर्श...

तमिळ चित्रपटातील गीतांनी सर्वसामान्य जनतेसाठी केवळ मनोरंजनाचं काम केलं नाही. तामिळनाडूतील चित्रपटांतील संवाद, गीतं आणि पात्रांनी सर्वसामान्यांना समाजाचा खरा चेहरा दाखवला आणि चित्रपटांच्या माध्यमातून समाजात राजकीय संदेश पोहोचवला. हेच कारण आहे की, चित्रपटगृह राजकीय चर्चेसाठी नवीन व्यासपीठं उदयास आली. येथे विचारधारा सहज आणि प्रभावीपणे मांडली जात होती.  

चित्रपटाच्या पडद्यावरील एमजीआर बनले लोकांचे तारणहार...

तमिळ चित्रपटातील एक मोठ नाव म्हणजे एमजी रामाचंद्रन. त्यांना एमजीआरच्या नावानेही ओळखलं जातं. म्हणून चांगल्या भूमिका साकारल्या. ते राजकारणात उतरल्यानंतर चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकांच्या पसंतीस पडल्या. त्यामुळे सर्वसामान्यांची मतं त्यांच्यासाठी एकगठ्ठा मतपेटी ठरली. सुरुवातीला ते डीएमकेचा भाग त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीची सुरुवात द्रविड आंदोलनापासून झाली. चित्रपटात त्यांनी गरीबांचे तारणहार होते, मात्र १९७२ मध्ये एमजीआर यांनी डीएमकेमधून वेगळं होत AIADMK ची स्थापना केली. 


हिरो ते राजकीय नेत्यापर्यंतचा प्रवास....

  • आपल्या चित्रपटात सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ठामपणे भूमिका घेणारे कमल हसन यांनी २०१८ मध्ये एमएनएम पक्षाची स्थापना केली. त्यांनी भ्रष्टाचारविरोधी, पारदर्शकता आणि शहरी प्रशासन यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. हेच ते मुद्दे होते जे त्यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये हाताळले. 

  • जे. जयललिता तब्बल अडीच दशकं तामिळनाडूच्या राजकारणात महत्त्वाचा चेहरा होत्या. एमजीआर यांच्या पावलांवर पाऊल ठेवत तमिळ चित्रपटक्षेत्रात टॉपची अभिनेत्री ते भारतातील सर्वात शक्तिशाली राजनेत्यांपैकी एक होण्याचा त्यांचा प्रवास आव्हानात्मक होता. त्यांनी १९९१ ते २०१६ दरम्यान १४ वर्षांहून अधिक काळ तामिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिल्या. त्यांनी सहावेळी सीएम पदाची शपथ घेतली. 
     
  • एम करुणानिधी अभिनेते नसले तरी चित्रपट क्षेत्राशी जोडलेले होते. ते प्रसिद्ध पटकथा लेखक होते. त्यांनी पराशक्ति, पोनार शंकर आणि पानम सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. ते १९४९ मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. १९६९ मध्ये ते पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यांनी पाच वेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले.
     
  • तामिळनाडूत पहिल्यांच निवडणुकीच्या मैदानात उतरलेले अभिनेता विजय म्हणजेच जोसेफ विजय चंद्रशेखर यांनी बंपर विजय मिळवला आहे. विजय यांची पार्टी टीव्हीकेने  १०० हून अधिक जागांवर विजय मिळवला. पक्ष स्थापन केल्यानंतर आपल्या पहिल्याच निवडणुकीत प्रचंड विजय मिळवणारे अभिनेते विजय हे एकमेव नेते नाहीत. यापूर्वी अनेक नेत्यांनी ही कामगिरी केली आहे.