तेलंगणामधील मंचेरियल जिल्ह्यातील एका मिशनरी शाळेची नासधूस केलीय. या जमावानं संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली आहे. शाळेच्या मुख्याध्यपकांनी धार्मिक पोशाख घालणाऱ्या काही विद्यार्थ्यांवर आक्षेप घेतला होता. या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्याध्यपकांसह दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय. दोन समुदायांमध्ये तणाव वाढवण्यास खतपाणी घालण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
हैदराबादपासून जवळपास 250 किलोमीटर अंतरावरील कन्नेपल्ली गावातील ब्लेस्ड मदर टेरेसा हायस्कुलमध्ये हा प्रकार घडला आहे. या शाळेचे मुख्याध्यापक जोसेफ यांनी दोन दिवसांपूर्वी शाळेत भगवा ड्रेस घालून आलेल्या मुलांवर आक्षेप घेतला होता. त्यांनी मुलांकडं याबाबत विचारणा केली. त्यावर आम्ही 21 दिवसांचे हुनमान अनुष्ठान दीक्षा व्रत करत आहोत, असं विद्यार्थ्यांनी सांगितलं. त्यानंतर जोसेफ यांनी या मुलांच्या आई-वडिलांना या विषयावर चर्चा करण्यासाठी शाळेत बोलावलं.
रामनवमीला गालबोट, 'जय श्रीराम' घोषणा दिली म्हणून रॉडनं मारहाण
या प्रकरणात सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओनंतर हे प्रकरण आणखी चिघळलं. मुख्याध्यापक शाळेच्या परिसरात हिंदू पोशाख घालण्यास मनाई करत आहेत, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला. त्यानंतर जमावानं शाळेवर हल्ला केला. या हल्ल्याच्या व्हिडीओनुसार, भगवे कपडे घातलेल्या जमावानं जय श्रीरामच्या घोषणा देत खिडकीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यानं घाबरलेले शिक्षक हात जोडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावाला घटनास्थळावरुन पांगवण्याचा प्रयत्न करत होते.
याबाबतच्या वृत्तानुसार काही जणांना मुख्याध्यापक जोसेफ यांना घेरलं. त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या कपाळावर जबरदस्तीनं गंध लावलं. आंदोलकांनी शाळेनं माफी मागावी अशी मागणी केलीय