कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये रामनवमीला गालबोट लागलंय. रामनवमीच्या निमित्तानं 'जय श्रीराम' ची घोषणा देणाऱ्या तीन जणांना कथित मारहाण झाल्याचं वृत्त आहे. चिकाबेट्टाहल्ली परिसरात हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणातील चारपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य दोन आरोपींमध्ये एक अल्पवयीन आहे. धार्मिक भावना दुखावणे तसंच दंगल करण्यासह अन्य आरोपांमध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन कुमार, राहुल आणि विनायक हे तीन जण त्यांच्या कारमधून सेकंड हँड गाडी खरेदीसाठी जात होते. त्यावेळी ते कारमधून जय श्रीरामच्या घोषणा देत होते. तसंच त्यांनी भगवा झेंडा लावला होता.
याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी फरमान आणि समीर या दोन बाईकस्वारांनी उत्तर बंगळुरुमधल्या चिक्काबेट्टाहल्ली परिसरात त्यांना अडवलं. तुम्ही जय श्रीरामच्या घोषणा का देत आहात? अल्लाहू अकबरच्या घोषणा द्या, असं त्यांना धमकावलं.
ट्रकने बाइकला नेले फरफटत, लटकलेल्या अवस्थेतील बाइकस्वाराचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
फरमान आणि अन्य तीन जणांनी त्यांच्या गाडीला लावलेला झेंडा हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यापैकी दोन जणांनी त्यांचा पाठलाग केला. समीर तिथून निघून गेला होता. थोड्यावेळानं हे सर्व जण त्यांच्या कारमधून परत आले. त्यावेळी समीर आणि फरमाननं पवन कुमार, राहुल आणि विनायकवर हल्ला केला.
श्रीरामापासून प्रत्येकानंच शिकल्या पाहिजेत 'या' 5 गोष्टी
फरमान आणि समीरसोबत अन्य दोन आरोपी देखील या मारहाणीत सहभागी होते. त्यांनी राहुल आणि विनायकवर हल्ला केला. राहुलला रॉडनं मारहाण केली. त्यामध्ये त्याच्या डोक्याला दुखापत झाली. तर, विनायकच्या नाकाला दुखापत झाली. या मारहाणीनंतर आरोपी घटनास्थावरुन पळून गेले. पवननं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. फरमान आणि समीरला अटक करण्यात आली आहे. तर दोन संशयित आरोपींचा ताब्यात घेण्यात आले असून त्यामधील एक अल्पवयीन आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world