भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सगळीकडेच ऐरणीवर आला आहे. मग ते मुंबई असो की दिल्ली. कोणते ही राज्य यासा अपवाद नाही. शिवाय या भटक्या कुत्र्यांचे सर्व सामान्य नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रमाण ही वाढले आहे. त्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. अशीच एक घटना हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील सुजानपूर नगर परिषद क्षेत्रात घडली आहे. सोमवारी एका भटक्या कुत्र्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. या कुत्र्याने एकाच दिवसात तब्बल 24 लोकांना चावा घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सुजानपूर परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या 24 पैकी 23 जणांवर सुजानपूर येथील रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. तर, गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला हमीरपूरच्या जिल्हा रुग्णालयात (District Hospital) पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. सुजानपूर नगर निगमचे अधिकारी रमन शर्मा यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या कुत्र्याला पकडण्यासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?
लहान मुलांमध्ये यामुळे भीती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही मादी कुत्री गेल्या काही दिवसांपासून सुजानपूर नगर निगम परिसरात फिरत होती. सोमवारी सकाळी या कुत्रीने अचानक पादचाऱ्यांवर हल्ला (Attack) करण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुजानपूर रुग्णालयाचे गट वैद्यकीय अधिकारी (BMO) राज कुमार यांनी सांगितले की, जखमी झालेल्या सर्व व्यक्तींना अँटी-रेबीज (Anti-Rabies) लस तातडीने देण्यात आली आहे. रुग्णालयात अजूनही कुत्रे चावल्याचे अन्य रुग्ण उपचारांसाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले.