वाढत्या महागाईत सर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकारणार होणे दिवसेन दिवस अवघड होत चाललं आहे. त्यात पुणे शहरात स्वतःचे घर घेणे, हे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांचे स्वप्न असते. मात्र, भूखंडांच्या वाढत्या किंमती आणि महागाईमुळे हे स्वप्न अनेकदा पूर्णत्वास जात नाही. अशा परिस्थितीत, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या लॉटरी योजनेअंतर्गत पुण्यातल्या एका प्राईम लोकेशनवर अत्यंत कमी दरात घरे मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. शिवाय ही घरं सर्व सामान्यांच्या आवाक्यातील आहेत.
पुण्यातील वाकड या विकसित होत असलेल्या परिसरात म्हाडाने 28 घरे लॉटरीसाठी राखीव ठेवली आहेत. यश्विन अर्बो सेंट्रो (Yashwin Urbo Centro) या खासगी गृहनिर्माण प्रकल्पातील ही घरे आहेत. हा प्रकल्प वाकडमधील भूमकर चौकाजवळ, इंदिरा गांधी कॉलेजच्या परिसरात आणि मुख्य हायवेला लागून आहे. प्रसिद्ध विलास जावळकर ग्रुपकडून हा प्रकल्प विकसित केला जात आहे. या 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट्सचा कार्पेट एरिया अंदाजे 500 ते 600 स्क्वेअर फूट इतका आहे.
या म्हाडा योजनेतील फ्लॅट्सची किंमत Rs. 28.42 लाख ते Rs. 28.74 लाख इतकी निश्चित करण्यात आली आहे. याच परिसरातील इतर खासगी प्रकल्पांमध्ये समान आकाराच्या घरांसाठी सुमारे Rs. 80 लाख ते Rs. 90 लाख मोजावे लागतात. यामुळे, म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची तब्बल 60 लाखांपेक्षा अधिक बचत होणार आहे. अत्यंत उत्तम आणि हायवे टच लोकेशनवर इतक्या कमी दरात घर मिळणे, ही एक दुर्मिळ संधी आहे.
या लॉटरी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि सोपी ठेवण्यात आली आहे. इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट https://lottery.mhada.gov.in ला भेट देऊन ''Pune Board Lottery 2025'' हा विभाग निवडावा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे, इच्छुक अर्जदारांनी मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन म्हाडाने केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world