जम्मू काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात हवाई दलाचे 4 जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हवाई दलाच्या वाहनाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
हल्लानंतर एअर फोर्सच्या वाहनांचा ताफा सुरक्षितपणे शाहसितारजवळील एअर बेस कॅम्पवर पोहोचला आहे. सध्या राष्ट्रीय रायफलच्या जवानांकडून परिसरात शोधमोहिम सुरु आहे.
Advertisement
Topics mentioned in this article