Tamil Nadu News: थलपतीच्या शपथविधीला पुन्हा ग्रहण! मध्यरात्री गणित फिस्कटलं; सत्तास्थापनेचा सस्पेन्स कायम

'व्हीसीके'ने ऐनवेळी पाठिंबा देण्यास टाळाटाळ केल्याने आणि 'आययुएमएल'ने अफवांचे खंडन केल्याने विजय यांच्याकडे बहुमतासाठी अद्याप दोन आमदारांची कमतरता भासत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Thalapathy Vijay News:  दाक्षिणात्य सुपरस्टार आणि 'तमिळगा वेत्री कळघम'चे (TVK) प्रमुख विजय यांच्या सत्तास्थापनेच्या मार्गातील अडथळे दूर होताना दिसत नाहीत. शनिवारी (९ मे) सकाळी ११ वाजता होणारा त्यांचा शपथविधी आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. 'व्हीसीके'ने ऐनवेळी पाठिंबा देण्यास टाळाटाळ केल्याने आणि 'आययुएमएल'ने अफवांचे खंडन केल्याने विजय यांच्याकडे बहुमतासाठी अद्याप दोन आमदारांची कमतरता भासत आहे.

Trending News: "300 कोटी मिळाले तर..",काँग्रेस आमदार निर्मला सप्रेंच्या विधानाने खळबळ, भाजपचंही टेन्शन वाढलं

तामिळनाडूमध्ये सत्तानाट्य कायम... 

राज्यात सध्या बहुमतासाठी ११८ चा आकडा गाठताना विजय यांच्या आघाडीची दमछाक होताना दिसत आहे. विजय यांनी ११६ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र राज्यपालांना दिले असले, तरी आवश्यक बहुमतासाठी अजून २ आमदारांची गरज आहे. यातच 'आययुएमएल'ने आपण द्रमुकसोबतच असल्याचे स्पष्ट केल्याने विजय यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

व्हीसीके प्रमुख थोल. थिरुमावलवन सध्या नॉट रिचेबल असून त्यांचे समर्थन पत्र मिळवण्यासाठी टीव्हीकेचे नेते शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून काँग्रेसने आपल्या आमदारांना चेन्नईहून शेजारच्या कर्नाटकात हलवले आहे. आता सर्वांचे लक्ष व्हीसीकेच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीकडे लागले आहे.

​शुक्रवारी मध्यरात्रीपासून तमिळनाडूच्या राजकारणात नाट्यमय घडामोडींना वेग आला. विजय यांनी राज्यपालांची तीनवेळा भेट घेऊन ११६ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले होते. मात्र, ११ महत्त्वाच्या  जागा असलेल्या 'व्हीसीके'चे अधिकृत पत्र न मिळाल्याने राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी शपथविधीची घोषणा रोखून धरली आहे. दरम्यान, घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या पाच आमदारांना तातडीने बेंगळुरूला हलवले आहे. सत्तेच्या समीकरणात आता 'व्हीसीके'चे थोल. थिरुमावलवन यांची भूमिका निर्णायक ठरणार असून, शनिवारी पक्ष आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करणार आहे.

नक्की वाचा >> Jalna News: नवरदेवाचा बूट पळवला अन् लग्न मंडपात झाला तुफान राडा, करवल्यांनी झिंज्या उपटल्या अन्..पाहा Video