जाहिरात

Jalna News: नवरदेवाचा बूट पळवला अन् लग्न मंडपात झाला तुफान राडा, करवल्यांनी झिंज्या उपटल्या अन्..पाहा Video

लग्न सोहळ्यात बुट चोरल्यामुळे पाहुण्यांमध्ये राडा झाला आणि तुंबळ हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

Jalna News: नवरदेवाचा बूट पळवला अन् लग्न मंडपात झाला तुफान राडा, करवल्यांनी झिंज्या उपटल्या अन्..पाहा Video
Jalna Wedding Clash Video Viral

लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी 

Jalna Marriage Viral Video : संसार प्रपंचाचा गाडा सुरु करण्याआधी विधिवत लग्नविवाह सोहळा पार पडतो. लग्न जमल्यापासून ते सोहळ्यापर्यंत दोन्ही कुटु्ंबात आनंदाचं वातावरण असतं. परंतु, लग्न सोहळ्यात क्षुल्लक कारणावरून वाद विवाद झाल्यास मंडपात आनंदाचे वातावरण कधी दु:खात बदलतं,हे कळतच नाही. असाच एक धक्कादायक प्रकार जालन्यात घडला आहे. लग्नातील पारंपरिक “नवरदेवाचा बूट पळवण्याचा” खेळ चक्क हाणामारीपर्यंत पोहोचल्याने अनेकांना धक्काच बसला. लग्न सोहळ्यात बुट चोरल्यामुळे पाहुण्यांमध्ये राडा झाला आणि तुंबळ हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

मंडपात दोन्ही कुटुंबात धुमश्चक्री

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील एक शुभविवाह सोहळ्याला अचानक गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे.सजलेल्या मंडपात दोन्ही कुटुंबात धुमश्चक्री झाल्याचं पाहायला मिळालं. लग्नसोहळा सुरू असताना वधू पक्षातील मंडळींनी नेहमी प्रमाणे नवरदेवाचा बूट पळवण्याचा प्रयत्न केला.मात्र याला वर पक्षातील मंडळींनी जोरदार विरोध केला. बूट कोण पळवणार आणि कोण वाचवणार? यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली.

नक्की वाचा >> Worlds Biggest Thief: जगातील सर्वात मोठा चोर..गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद,आख्यायिका वाचून थक्क व्हाल

एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली अन्..

सुरुवातीला पाहुण्यांना हा प्रकार थट्टा-मस्करीचा भाग वाटत होता. पण काही क्षणातच वातावरण तापलं आणि वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं.लग्न मंडपात कोणी बूट हिसकावत होतं,तर कोणी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होतं. त्यामुळे उपस्थित पाहुण्यांचीही मोठी धांदल उडाली.अखेर या “बूट युद्धाची” माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही पक्षांना शांत केलं.याप्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान,या संपूर्ण प्रकारानंतर “नवरी मिळाली पण बूट मिळाले नाहीत”अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

नक्की वाचा >> Sambhajinagar News: छत्रपती संभाजी नगरात भयंकर घटना, नगरसेवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न, CCTV व्हिडीओमुळे खळबळ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com