‘या’ नदीला म्हणतात गंगेची मोठी बहीण, वाचा कसा झाला उगम?

गंगा नदीबद्दल अनेकांना माहिती असते. पण गंगेची मोठी बहीण म्हणून कोणत्या नदीला मान्यता आहे हे बहुतेकांना माहिती नसते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Sister River Of Ganga : हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना (Rivers) श्रद्धेचं केंद्र मानलं जातं. गंगा नदीला (Ganga River) मोठं महत्त्व असून ती सर्वात पवित्र मानली जाते. गंगा नदीबद्दल अनेकांना माहिती आहे. पण गंगेची मोठी बहीण म्हणून कोणत्या नदीला मान्यता आहे याची बहुतेकांना माहिती नाही.

पौराणिक समजुतीनुसार देविका नदीला (Devika) गंगेची मोठी बहीण समजले जाते. जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील पर्वतांमध्ये देविका नदीचे उगम स्थान आहे. ही नदी उत्तर पश्चिमेला वाहते आणि तिचा रावी नदीशी संगम होतो.

गुप्त नदी

देविका नदीचा उगम होतो त्या ठिकाणाला देविकानगरी म्हणूनही म्हंटले जाते. ही नदी उगम झाल्यानंतर काही भागात दिसते तर काही ठिकाणी गायब होते. त्यामुळे या नदीला गुप्त नदी म्हणूनही म्हंटले जाते. 

कसा झाला उगम?

शास्त्रानुसार देविका नदीला पार्वती मातेचं रुप मानलं जातं. भगवान शंकरानं दिलेल्या आदेशानंतर डुग्गर प्रदेशाच्या उद्धारासाठी पार्वती मातेनं या नदीचं रुप धारण केलं. देविका नदी जिथं प्रकट झाली त्या काठावर शिव मंदिर आहे. 

देविका नदीच्या काठावर ज्यांचे अंत्यसंस्कार केले जातात त्यांची राख गंगेत विसर्जित करत नाहीत, असं सांगितलं जातं. देविका नदीमध्ये विसर्जित करण्यात आलेली हाडं ही आपोआप गायब होतात. ती कुठंही दिसत नाहीत, अशीही समजूत आहे. 

Advertisement

(Disclaimer : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. NDTV मराठी याची पृष्टी करत नाही.)

Topics mentioned in this article