Jammu-Kashmir Terrorist Encounter: जम्मू-काश्मीरमधील शेपियान येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. शोपियानच्या जंगलात 4 दहशतवादी लपले असल्याची गु्प्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने ही कारवाई केली.
दहशतवादी शोपियानच्या जामपाथरीमध्ये लपले होते. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित हे दहशतवादी असल्याचीही माहिती मिळत आहे. दहशतवादी जंगलात लपले असल्याची माहिती मिळाल्यानतंर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानींनीही चोख प्रत्युत्तर दिलं. यात 3 दहशतवादी ठार झाल्याची बातमी आहे.
(नक्की वाचा- Indian Army PC: 'समझदार को इशारा काफी...' लष्कराची स्फोटक पत्रकार परिषद, वाचा 10 मोठे मुद्दे)
दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्यांशी संबंधित आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या चकमकीत दहशतवादी शाहिद अहमद ठार झाल्याचीही माहिती मिळत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
(नक्की वाचा- Toxic Liquor : विषारी दारू प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू, 6 जण गंभीर; पंजाबमधील खळबळजनक घटना)
यामध्ये दोन पाकिस्तानी दहशतवादीही असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील शुक्रू केलर भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, ज्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. चकमक अद्यापही सुरुच आहे.