Tina Dabi : लातूरच्या IAS सुनेला राष्ट्रपतींकडून 2 कोटींचं बक्षीस, एकटीनं अख्ख्या राज्यावरील संकट केलं दूर

 IAS टीना डाबी यांची पुन्हा एकदा देशभरात चर्चा सुरू आहे. यंदा कारणही खास आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Tina Dabi rain water harvesting in Rajasthan : IAS टीना डाबी यांची पुन्हा एकदा देशभरात चर्चा सुरू आहे. यंदा कारणही खास आहे. लातूरची सून असलेल्या आयएएस टीना डाबी यांनी एका राज्यावरील मोठं संकट दूर केलं आहे. टीना डाबीने २०१५ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडिया रँक १ पटकावलं होतं. नुकतंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना २ कोटींचा पुरस्कारही दिला आहे. टीना डाबी यांनी केलेल्या कामाचं पुन्हा एकदा देशभरात कौतुक केलं जात आहे. 

वाळवंटात आता पाण्याचा 'सुकाळ'...

टीना डाबी या बाडमेरच्या जिल्हा कलेक्टर आहेत. त्यांनी पाहिलं की, पश्चिम राजस्थानमध्ये पिण्याचं पाणी मिळणं कठीण होतं. यातील अधिकांश भाग वाळवंटाचा आहे. त्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष्य असतं. या भागातील जमिनीत पाणी नाही, त्यामुळे बोरींग करून पाणी काढणं अशक्य. अशावेळी टीना डाबी यांनी 'कॅच द रेन' (Catch the Rain) या योजनेअंतर्गत पाणी जमा करण्याची योजना सुरू केली. जमिनीतील पाणी काढता येत नाही, मात्र आकाशातून कोसळणारं पाणी जमा तर नक्कीच करू शकतो, ही बाब लक्षात घेऊन संपूर्ण बाडनेरमध्ये टीना डाबी यांनी जनतेच्या सहभागातून ही योजना सुरू केली. 

नक्की वाचा - Maithili Thakur Property: 25 व्या वर्षी कोट्यवधींची मालकीण! मैथिली ठाकूर किती कमावते? संपत्तीचा आकडा पाहाचं

बाडमेर मॉडेल काय आहे? 

टीना डाबी यांनी बाडमेरमध्ये 'कॅच द रेन' नावाचं अभियान सुरू केली. याअंतर्गत ठिकठिकाणी मोठ्या संख्येने जमिनीत मोठमोठ्या टाक्या (८७,००० टाक्या) बसवण्यात आल्या. ज्यामुळे पावसाचं पाणी वाया न जाता या टाक्यांमध्ये जमा होऊ लागलं. याशिवाय सर्वत्र रुफ टॉपवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरू करण्यात आलं. घरावर टाक्या बसविण्यात आल्या, याशिवाय घरांवर पडणारं पाणी विविध प्रकार जमा करण्यात आलं. यासाठी प्रत्येक घराशेजारी छोट्या टाक्या बांधण्यात आल्या, त्यामुळे पावसाळ्यात हे पाणी जमा केलं जातं. 

लातूरच्या सून आहेत टीना डाबी...

राजस्थानच्या टीना डाबी यांनी लातूरचे आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्यासोबत २०२२ मध्ये विवाह केला. टीना डाबी यांचां हा दुसरा विवाह. मूळचे लातूरचे असलेले प्रदीप गावंडे यांच्याशी २०२२ मध्ये लग्न केल्यानंतर २०२३ मध्ये टीना डाबी यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांनी अत्यंत साध्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर लग्न केलं. यावेळी त्यांच्या लग्नाचे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.  
 

Advertisement