RailOne App Train Ticket Discount: रेल्वेच्या जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. जे प्रवासी 'रेलवन' ॲपद्वारे ऑनलाइन तिकीट बुक करतात, त्यांना डिजिटल तिकिटांवर ३ टक्के सवलत दिली जात आहे. रेल्वेने आता ही सवलत वाढवण्याची घोषणा केली असून, ही बोनस योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या तिकिटांवरील पैशांची थेट बचत होईल.
रेल्वेच्या तिकीटांवर सवलत
प्रवाशांना अनेकदा सर्वसाधारण तिकिटांसाठी लांब रांगेत थांबावे लागते. जेव्हा ट्रेन येणार असल्या घोषणा होते, पण प्रवाशाकडे तिकीट नसते, तेव्हा अडचण निर्माण होते. मात्र, 'रेलवन' ॲपद्वारे सर्वसाधारण तिकिटे उपलब्ध झाल्यामुळे ही गैरसोय दूर झाली आहे. तिकिटांवरील विशेष सवलतींमुळे पैशांची बचतही होते. रेल्वेने जाहीर केले आहे की, जर प्रवाशांनी 'रेलवन' ॲपद्वारे अनारक्षित किंवा सर्वसाधारण तिकिटे बुक केली, तर त्यांना एकूण भाड्यावर ३ टक्के सवलत मिळेल. याचा अर्थ त्यांना ३ टक्के कमी पैसे द्यावे लागतील.
Ola Uber चे भाडे आता थेट सरकार ठरवणार, राज्य सरकारचे नवे धोरण जाहीर, वाचा सविस्तर माहिती
तिकिटांवरील ही सवलत सर्व डिजिटल पेमेंटवर लागू आहे. याचा अर्थ असा की, UPI, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरून पैसे भरणाऱ्या प्रवाशांना सवलत मिळेल आणि पेमेंट करणे सोपे होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही तुमच्या प्रवासासाठी घरबसल्या आरामात जनरल तिकीट बुक करू शकता. पूर्वी यासाठी काउंटरवर रांगेत उभे राहावे लागत असे.
तुम्ही स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच तुमचे तिकीट बुक करून थेट ट्रेनमध्ये चढू शकता. यामुळे वेळेची बचत होते. शिवाय, हे तिकीट पूर्णपणे डिजिटल असल्यामुळे ते हरवण्याचा धोका नाहीसा होतो. ते तुमच्या मोबाईल ॲपमध्ये साठवले जाते. दरम्यान, रेल्वेने स्पष्ट केले आहे की, RailOne ॲपद्वारे बुक केलेली तिकिटे व्हॉट्सॲपसारख्या इतर उपकरणांवर दाखवली जाऊ शकत नाहीत. शिवाय, तुमचा मोबाईल फोन RailOne वर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी: महायुतीमध्ये पुन्हा ठिणगी! 48 हजार कोटींचा निर्णय आणि 'त्या' एका बंगल्यावरून वाद चव्हाट्यावर