Trending News: 7 मिनिटांत कॅन्सरवर उपचार, भारतात 'ते' इंजेक्शन आलं, किंमत ऐकून म्हणाल बाप रे बाप...

पारंपरिक पद्धतीमध्ये कॅन्सर रुग्णांना आयव्ही (IV) इन्फ्युजनद्वारे इम्युनोथेरपी दिली जाते.

जाहिरात
Read Time: 2 mins

कॅन्सरचे नाव ऐकताच डोळ्यांसमोर येतात ते प्रदीर्घ उपचार, रुग्णालयातील तासन्तास आणि वेदनादायक थेरपी. मात्र, भारतातील फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांसाठी आता एक अत्यंत दिलासादायक आणि क्रांतिकारी बातमी आली आहे. 'रोश फार्मा इंडिया' (Roche Pharma India) या कंपनीने देशात एक असे नवीन इंजेक्शन लाँच केले आहे, जे रुग्णाला अवघ्या 7 मिनिटांत दिले जाऊ शकते. 'टेसेंट्रिक' (Tecentriq) असे या नवीन इम्युनोथेरपी औषधाचे नाव आहे.  ते 'नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर' (NSCLC) च्या रुग्णांसाठी विकसित करण्यात आले आहे. या औषधाच्या वेगाइतकीच सध्या त्याची किंमतही चर्चेत आहे. कारण याच्या एका डोसची किंमत तब्बल 3.7 लाख रुपये आहे.

काय आहे हे 7 मिनिटांचे कॅन्सर शॉट?
पारंपरिक पद्धतीमध्ये कॅन्सर रुग्णांना आयव्ही (IV) इन्फ्युजनद्वारे इम्युनोथेरपी दिली जाते. ज्यासाठी अनेक तास लागतात. मात्र, या नवीन तंत्रज्ञानात औषध थेट त्वचेच्या खाली (Subcutaneous) टोचले जाते. यामुळे संपूर्ण प्रक्रिया अवघ्या 7 मिनिटांत पूर्ण होते. वृद्ध रुग्ण आणि दूरवरून उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठी ही पद्धत अत्यंत सोयीची ठरणार आहे.

Advertisement

नक्की वाचा - Interesting news: 600 जावई,3500 किलो आंबे, 7 हजार लिटर आमरस अन् शाही बेत, काय असते ही धोंडे जेवणाची प्रथा?

हे औषध कसे काम करते?
या इंजेक्शनमध्ये 'अॅटेजोलिझुमॅब' (Atezolizumab) नावाचे घटक आहे. जे शरीरातील 'PD-L1' नावाच्या प्रोटीनला ब्लॉक करते. कॅन्सरच्या पेशी याच प्रोटीनचा वापर करून शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीपासून लपून राहतात. हे प्रोटीन ब्लॉक झाल्यामुळे शरीरातील इम्युन सेल्स कॅन्सर पेशींना ओळखून त्यांच्यावर हल्ला करतात. कीमोथेरपीच्या तुलनेत याचे साइड इफेक्ट्स देखील कमी असतात.

नक्की वाचा - लंडनमध्ये कुठे आणि कोणत्या स्थितीत आहे भोजशाला मंदिरातील वाग्देवीची मूळ मूर्ती? पाहा Exclusive फोटो

सर्वसामान्यांसाठी किंमत हे मोठे आव्हान
या इंजेक्शनची गती जितकी प्रभावी आहे, तितकीच त्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. एका डोसची किंमत 3.7 लाख रुपये आहे. उपचारादरम्यान रुग्णाला अशा 6 डोसची गरज भासू शकते. म्हणजेच एकूण खर्च लाखांच्या घरात जातो. कंपनीने यासाठी 'ब्लू ट्री' नावाचा मदत कार्यक्रम सुरू केला आहे आणि सीजीएचएस (CGHS) योजनेतही याचा समावेश करण्यात आला आहे. तरीही, भारतातील सर्वसामान्य रुग्णांपर्यंत हे उपचार पोहोचवण्यासाठी अधिक किफायतशीर पर्यायांची गरज आहे.