- इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला पक्ष्याने धडक दिल्यामुळे पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले होते
- विमान गोरखपूरहून बेंगळुरूकडे जात होते. विमानात २१६ प्रवासी प्रवास करत होते.
- वैमानिकाने विमानाच्या संरचनेतील नुकसानीमुळे पुढील उड्डाण करण्यास नकार दिला
इंडिगो एअरलाईन्सच्या 6ई-437 या विमानाला हवेत पक्षाने धडक दिल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. या धडकेमुळे विमानाच्या पुढच्या भागाचे (नोज सेक्शन) मोठे नुकसान झाले. त्यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाली होती. हे विमान गोरखपूरहून बेंगळुरूकडे जात होतं. पक्षाने धडक दिल्याने विमानाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले होते. त्यावेळी विमानात जवळपास 216 प्रवाशी होते. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तत्काळ वाराणसी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला. त्यानंतर विमान वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्याचा निर्णय घेतला.
वाराणसी एअर पोर्टवर संपर्क करण्यात आला होता. त्यानुसार सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. संध्याकाळी 7:05 वाजता विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. प्राथमिक तपासणीत विमानाच्या पुढच्या भागाला तडे गेल्याचे दिसून आले. सुरक्षेच्या कारणास्तव वैमानिकाने पुढील उड्डाण करण्यास नकार दिल्याने ही फ्लाईट रद्द करण्यात आली. पण त्याने जो काही निर्णय घेतला त्यामुळे अनेकांचे जीव मात्र नक्कीच वाचले. सर्व प्रवाशांनी सुरक्षित लँडींगनंतर सुटकेचा निश्वास सोडला.
विमानातील 216 प्रवाशांना रात्री 8:40 च्या सुमारास सुखरूप खाली उतरवण्यात आले. इंडिगोने प्रवाशांच्या निवासाची सोय शहरातील विविध हॉटेल्समध्ये केली होती. तांत्रिक पथकाकडून सध्या विमानाची सखोल तपासणी सुरू आहे.तपासणीत त्रुटी आढळल्या आहेत. विमान बे नंबर-03 वर उभे केल्यानंतर तांत्रिक पथकाने त्याची पाहणी केली. विमानाच्या संरचनेला नुकसाना पोहोचल्याचे स्पष्ट झाल्यावर ही उड्डाण सेवा रद्द करण्यात आली. वैमानिकाच्या धाडसी निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळली, असे विमानतळ सूत्रांनी सांगितले.
या घटनेनंतर ते उड्डण रद्द करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांचे काय होणार हा प्रश्न होता. पण इंडिगो प्रशासनाने सर्व प्रवाशांची सोय केली होती. प्रवाशांची पर्यायी सोय करून त्यांना दिलासा देण्यात आला. रात्री सुरक्षितपणे उतरवून हॉटेलमध्ये या सर्व प्रवाशांना नेण्यात आले. इंडिगो एअरलाईन्स या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत असून विमानाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून सातत्याने माहिती दिली जात आहे.