Trending News: प्लास्टिक बाटली द्या आणि बक्षीस मिळवा! कचरा दिल्यावर मिळतोय रिवॉर्ड, काय आहे ही अनोखी मोहीम?

या उपक्रमामुळे समुद्रात जाणारे प्लास्टिक कमी होईल, समुद्री जीवांचे रक्षण होईल आणि बीचचे सौंदर्य टिकून राहील.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • चेन्नईच्या मरीना बीचवर प्लास्टिक कचरा जमा केल्यावर बक्षिस देणारी अनोखी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे
  • लोक प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा संकलन केंद्रांवर जमा करून कूपन आणि रिवॉर्ड्स मिळवत आहेत
  • या उपक्रमामुळे पर्यावरण जागरूकता वाढत आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

काही मोहीमा अशा असता  की त्या अनोख्या वाटतात. लोकांना ही त्याचं अप्रुप असतं. त्यामुळेच त्या वेगळ्या ठरतात. अशीच एक मोहीम चेन्नईच्या मरीना बीचवर पाहायला मिळत आहे.  चेन्नईचा मरीना बीच आता फक्त फिरण्याचे ठिकाण राहिलेले नाही, तर तो स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे एक प्रेरणादायी उदाहरण बनला आहे. येथे एका विशेष उपक्रमांतर्गत, लोकांना प्लास्टिक कचरा जमा केल्याबद्दल बक्षीस दिले जात आहे. तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. कचरा द्या अन् बक्षिस मिळवा अशी ही मोहीम आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकही या स्वच्छता मोहिमेचा भाग बनत आहेत. त्याचे सगळीकडेच कौतूक होत आहे. 

मरीना बीचवर बसवण्यात आलेली विशेष मशिन्स आणि संकलन केंद्रांवर (Collection Points) लोक प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा जमा करू शकतात. त्याबदल्यात त्यांना रिवॉर्ड्स, कूपन किंवा इतर सुविधा दिल्या जातात. या उपक्रमाचे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहेत. लोकांना प्लास्टिक कचरा फेकून देण्याऐवजी तो गोळा करण्यासाठी प्रेरित करणे. शिवाय यातून बीच स्वच्छ ठेवला जात आहे. पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणे. लोकांचा ही यामध्ये प्रतिसाद वाढत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Ashok Kharat: खरातला कोण-कोण फोन करत होते? एक नाव तर धक्कादायक, दमानियांकडून कॉल डिटेल्स जाहीर

लोकांच्या सहभागामुळे चित्र बदलल्याचं ही पाहायला मिळत आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात सामान्य नागरिक उत्साहाने सहभागी होत आहेत. पर्यटक आणि स्थानिक लोक स्वतःहून कचरा उचलून जमा करत आहेत. विशेषतः मुले आणि तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आता स्वच्छता ही केवळ जबाबदारी उरली नसून, ते एक पुरस्कार मिळवून देणारे कार्य बनले आहे. प्लास्टिक कचरा समुद्र आणि समुद्री जीवासांठी अत्यंत घातक असतो. या उपक्रमामुळे समुद्रात जाणारे प्लास्टिक कमी होईल, समुद्री जीवांचे रक्षण होईल आणि बीचचे सौंदर्य टिकून राहील.

नक्की वाचा - MP News: 11 इंच लोखंडी सळई तरुणाच्या गळ्यात आरपार घुसली, अपघात पाहून प्रत्यक्षदर्शींच्या पायाखालची जमीन सरकली

मरीना बीचचा हा उपक्रम देशातील इतर शहरांसाठी एक उत्तम आदर्श ठरत आहे. जर अशाच प्रकारच्या योजना इतर पर्यटन स्थळांवरही राबवल्या गेल्या, तर भारतातील स्वच्छता मोहिमेला अधिक बळकटी मिळू शकते. चेन्नईच्या मरीना बीचने हे एक नवे उदाहरण सर्वां समोर ठेवले आहे. लोकही अशा मोहीमांचा भाग बनत आहेत. शिवाय त्यातून जनजागृती ही निर्माण झाली आहे. बक्षिस देण्याची संकल्पनाही भन्नाट वाटते. त्यामुळे तर ही मोहीम आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.